Home आरमोरी महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री उदयजी सावंत गडचिरोली दौऱ्यावर

महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री उदयजी सावंत गडचिरोली दौऱ्यावर

0
32

 

 

आरमोरी येथील शिंदे गट शिवसैनिकांनी दिली भेट,

          शिवसैनिकांनी केला सत्कार

 

महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री तथा मा. श्री. एकनाथ शिंदे गट खंदे समर्थक श्री. मा. उदय सामंत साहेब हल्ली गडचिरोली दौऱ्यावर आहेत. त्यांच्या येण्याची माहिती आरमोरी येथील एकनाथ शिंदे गट समर्थक पदाधिकाऱ्यांना मिळताच, मा. मंत्री यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी करून, आरमोरी ब्रम्हपुरी बर्डी रस्त्यावर असलेला नवीन बसस्थानक येथे मा. उदय सामंत यांच्या प्रतीक्षेत होते. मा. उद्योग मंत्री श्री. उदय सामंत हे आज दिनांक 24 नोव्हेंबर 2023 ला सकाळी सुमारे 11:00 वाजता च्या दरम्यान आरमोरी मध्ये आपल्या सुरक्षा ताफ्यासह दाखल झाले. त्यांच्या प्रतीक्षेत असलेले एकनाथ शिंदे शिवसेना गट पदाधिकारी व समर्थक यांनी मोठया उत्साहात पताख्यांच्या झळझळत्या आवाजात, पुस्पगुछ देऊन त्यांचा स्वागत केला. माननीय मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून, त्यांना सदिच्छा भेट देऊन ते पुढील मार्गास म्हणजे जिल्हा मुख्यालय गडचिरोली येथे निघून गेले.

 

*मा. मंत्री उदय सावंत यांनी घेतला सुंदर चाय सेंटर येथील चाय चा आस्वाद*

 

मा. उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या सुरक्षा ताफ्यासह आरमोरी येथील नवीन बसस्थानक येथे उपस्थित झाले असता, मा. एकनाथ शिंदे शिवसेना गटातील पदाधिकाऱ्यांनी मा. मंत्री यांना चहाचा आग्रह केला. लगतच असलेली सुंदर चाय सेंटर येथे चायचा आमंत्रण दिला. आपल्या टी स्टॉल वर मा. मंत्री उदय सामंत आले याच्या आनंदात आरमोरी नवीन बसस्थानक नजीकच असलेले सुंदर चाय सेंटर चे प्रोप्राटर श्री. नानूभाऊ ढोरे यांनी सहकुटुंब मा. मंत्री यांना पुष्पगुछ देऊन श्री. उदय सामंत यांचा स्वागत केला. मा. मंत्री उदय सामंत यांनी आरमोरी शहरात प्रसिद्ध असलेली सुंदर चाय सेंटर येथील नानूभाऊ ढोरे यांची येथील चायचा आस्वाद घेतला. व श्री. ढोरे यांच्या पारिवारिक घडामोळीचा व जीवन शैलीचा नित्यनियम सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. व आपल्या चायचा स्वाद आपल्या दुकानाच्या नावाप्रमाणे अतिशय सुंदर असल्याची ग्वाही ही दिली.

 

मा. उद्योग मंत्री यांच्या गडचिरोली दौऱ्याने जिल्ह्यात नवीन उद्योग येण्याचे आसार

 

चंद्रपूर जिल्ह्यातून विभाजन होऊन 26 ऑगस्ट 1982 रोजी गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली. आदिवासी, मागासवर्गीय, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात एकमात्र सुरजागड प्रकल्प सोडले असता कोणतेही मोठे उद्योग नाही. उत्तम प्रतीचे सांगवन, बांबू, मोहफूल, तसेच मोठया प्रमाणात लोहखनिज असून देखील या जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नाही. त्यामुळे येथील युवकांना रोजगारासाठी दुसऱ्या राज्यात दुसऱ्या जिल्ह्यात जावा लागतो. मात्र महाराष्ट्र राज्य उद्योग मंत्री श्री. उदय सामंत यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याने गडचिरोली जिल्ह्यातील तरुण युवकांचे, नागरिकांचे अपेक्षाना पेव फुटला असून जिल्ह्यात मोठे उद्योग येणार असल्याच्या अपेक्षा उजगर होत आहेत. व मा. उद्योग मंत्री यांनी जिल्ह्यात मोठे उद्योग आणून येथील तरुण पिढीला रोजगाचा माध्यम निर्माण करून द्यावा, अशा अपेक्षा मा. उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांच्याकडुन केली जात आहेत.

याप्रसंगी एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण धक्काते , राकेश बैस विधानसभा क्षेत्र संघटक, शैलेश कोहळे विधानसभा क्षेत्र सहसचिव, संतोष गोंधोळे जिल्हा सरचिटणीस, मधुसूदन चौधरी शिवसेना तालुका अध्यक्ष, सुभाष भोयर, प्रतीक भुरसे युवासेना तालुका प्रमुख, प्रवीण हर्षे शाखा प्रमुख वैरागड, नानूभाऊ ढोरे, चांदणी ढोरे, उर्मिला ढोरे, गीतांशू ढोरे, राजेंद्र दिवटे, भाऊदीप वरठे, प्रीतम जांभुळे, विनायक भोयर, अतुल भोयर, रोशन लक्षणे, अभिषेक भुरशे, प्रतीक भुरशे, अक्षय नैताम, गणेश भुरशे, अविनाश खोब्रागडे, महेश भुरसे, आशिष दुधबळे, आकाश उईके, आशिष लोथे, सूरज मेश्राम, राजेश्वर राऊत, नागेश वासेकर, बबलू पठाण, आकाश रामटेके, कोमल सहारे, विजय गोन्नाडे,राजू इन्कने, राजकुमार बैस, दिलदार बैस, उमेश माकडे, विजय धोटे, कुणालसिंग डांगी, भरत मेश्राम, दीपक बरसागडे, संतोष भोयर यासोबतच मोठया संख्येने आरमोरी निवासी जनता उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here