दिनांक २५/०८/२०२३ रोजी तक्रारदार नामे प्रमोद नकटू एवडे वय ४९ वर्ष धंदा किराणा दुकान चालक रा. मानापुर, ता. आरमोरी जि. गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन, आरमोरी येथे येवून रिपोर्ट दिली की, दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्रो ०१:०० वाजता दरम्यान त्यांच्या किराणा दुकानातून कोणीतरी अज्ञात इसमांनी त्यांच्या किराणा दुकानाच्या शटराचे कुलूप तोडुन दुकानाच्या आतमधे प्रवेश करुन त्यांच्या दुकानातील पैसे ठेवण्याच्या ड्रापमधील एकुण २,०००/- रुपये रोख रक्कम कुणी तरी अज्ञात चोरांनी चोरून नेले अशा रिपोर्ट वरून अप.क्र. २९०/२०२३ कलम ३८०, ४५७, ४६१, ३४ भा.द.वि. गुन्हा नोंद करून तपासात घेतला असून सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या आदेशान्वये पो.हवा./२५४० विशाल केदार यांच्याकडे देण्यात आले.
तेव्हा मा. साहिल झरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली तसेच मा. संदीप मंडलिक पोलीस निरीक्षक पो. स्टे. आरमोरी यांच्या मार्गदर्शनात घरफोडी चोरी या गंभीर गुन्हयातील पाहिजेत असलेल्या – अज्ञात आरोपीतांना अवघ्या ३० दिवसाचे आत निष्पन्न करुन आरोपी नामे १) रोशन पवनसिंग ठाकुर वय ३६ वर्ष, (२) किशोर ऊर्फे टमटम पंजाबराव जुमडे वय ३५ वर्ष दोन्ही रा. गडचिरोली यांचा शोध घेवून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले असुन दोन आरोपीतांपैकी एक क्रमांकाचा आरोपी जिल्हा कारागृह चंद्रपुर येथे न्ययालयीन कोठडीत आहे व दोन क्रमांकाचा आरोपी हा पोलीस स्टेशन आरमोरी येथे पोलीस कोठडी रिमांड मधे असुन नमुद दोन्ही आरोपी हे चोरी, घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार आहेत. दोन्ही आरोपीतांवर गडचिरोली व चंद्रपुर जिल्हयातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधे चोरी, घरफोडी, अवैध दारु विक्री सारखे अनेक गुन्हे नोंद आहेत.
मा. संदिप मंडलिक, पोलीस निरीक्षक पो.स्टे. आरमोरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन, आरमोरी येथील तपास पथकातील अंमलदार यांनी अहोरात्र परीश्रम घेवून गुन्ह्यातील आरोपीतांबाबत गोपणीय बातमीदारांचे सहायाने गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने आरोपीतां बाबत माहीती घेवुन आरोपी निष्पन्न करुन आरोपी क्रमांक ०१ याला जिल्हा कारागृह, चंद्रपुर येथून प्रोडक्शन वॉरंट द्वारे अटक केली व आरोपी क्र. ०२ याला सापळा रचुन गडचिरोली येथून अटक केली.
सदर गुन्हयाचा तपास मा. संदिप मंडलिक, पोलीस निरीक्षक पो.स्टे. आरमोरी यांच्या मार्गदर्शनात पो.हवा./२५४० विशाल केदार पो.स्टे. आरमोरी हे करीत आहेत.


