Home कोरची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दोन...

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या दोन आशा वर्करांचा बेतकाठीत सत्कार

0
32

 

 

कोरची

कोरची तालुक्यातील बेतकाठी ग्रामपंचायत कार्यालयात 31 मे 2023 रोज बुधवारला भारत सरकार यांच्या नारीशक्ती सन्मान उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार वितरण २०२३-२४ सोहळा आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन आशा वर्कर महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेतकाठी ग्रामपंचायत सरपंच कुंतीताई हुपुंडी तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच हेमेंद्र कावळे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश काटेंगे, सदस्य भारती नैताम, सदस्य लता नैताम, सदस्य रामजीलाल कुंजाम, सचिव डी एस भोयर, अंगणवाडी सेविका कल्पना ढवळे, प्रतिष्ठित नागरिक छबिलाल नैताम, संगणक चालक कोमल फुलकवर, रोजगार सेवक गजेंद्र आंदे, राजेश कुंजाम, शंकर सर्पा आदी उपस्थित होते.

कोरोना काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारी आशा वर्कर नम्रता दिलीप नंदेश्वर, विद्या जितेंद्र वाल्दे या दोघींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत स्तरीय ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ या सन्मानाने गौरव करीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ, एक हजार रुपयांचा चेक, शिल्ड देऊन सत्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here