युवारंग समाजहिताचे कार्य करणारे संघटन :- अशोकजी ठकराणी
आरमोरी :- नेहमी सामाजिक ,सांस्कृतिक, क्रीडा आरोग्य , औद्योगिक , शैक्षणिक व इतर क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग बहुउद्देशीय संस्था ,आरमोरी तर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिनांक २६ एप्रिल २०२३ पासून ते दिनांक १४ मे २०२३ पर्यंत निशुल्क समर कॅम्प आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कराटे ,योगा ,नृत्य , फोटोग्राफी ,चित्रकला ,संगणक ,आयुर्वेद, वन्यजीव ,बँकिंग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते या समर कॅम्पचा समारोप सोहळा दिनांक १४ मे २०२३ ला रविवार ला सायंकाळी ८:०० वाजता स्वामी विवेकानंद विद्यालय, आरमोरी येथे पार पडला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आरमोरी येथील प्रसिद्ध उद्योजक मा.अशोकजी ठकरांनी सर तर अध्यक्ष म्हणून युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष मा. राहुलजी जुआरे तर प्रमुख अतिथी म्हणून युवारंग महिला कमिटीच्या प्रमुख मा. चंदाताई राऊत , स्वय रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे अध्यक्ष मा.चारुदत्त राऊत सर ,जिजाऊ शक्ती कराटे ग्रुपचे मुख्य प्रशिक्षक मा. राजुजी घाटूरकर सर,समाजसेवक मा. रणजीतजी बनकर, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. देवानंदजी दुमाने , योग प्रशिक्षक मा. धनराजजी कांबळे समाजसेवक मा. केवळरामजी किरणापुरे सर उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरवात राजमाता जिजाऊ , छत्रपती शिवाजी, महाराज छत्रपती संभाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्पर्पण करून करण्यात आले त्यानंतर समर कॅम्प विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणत कार्यक्रम सुरुवात केली या कार्यक्रमात गोंडी, वेस्टर्न, साऊथ इंडियन सॉंग वर विद्यार्थ्यांनी डान्स सादर केले महापुरुषांच्या इतिहासावर स्पीच सादर केले, व आजच्या युगात वाढत चाललेल्या सोशल मीडिया वर जनजागृतीपर नाटय सादर केले याप्रसंगी शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते.


