कोरची
अनुदानित माँसाहेब माध्यमिक आश्रमशाळा कोटरा येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोरचीचे मंडळ अधिकारी पी एम धाईत, प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक रमेश नान्ने, विलास गावंडे तसेच माध्यमिक शिक्षक सर्वश्री सुधाकर कामडी, अरविंद काशीवार, नमो मेश्राम व प्राथमिक शिक्षक सर्वश्री रमेश शहारे, मोतीराम मोहुरले, देवानंद पुराणकर, खिरेश ढवळे,अधिक्षक मुकेश हरडे व राकेश कुलसनगे, घनश्याम वनवे, सुशील मस्के, नितीन पितुलवार, अनिल सहारे,सोनाल कोरेटी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते फोटोचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. तसेच मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शहारे तर आभारप्रदर्शन नमो मेश्राम यांनी केले.


