Home Breaking News ३६ वर्षांची अखंड सेवा पूर्ण; सुनील पेम्पकवार यांचा गौरवपूर्ण निरोप

३६ वर्षांची अखंड सेवा पूर्ण; सुनील पेम्पकवार यांचा गौरवपूर्ण निरोप

0
24

३६ वर्षांची अखंड सेवा पूर्ण; सुनील पेम्पकवार यांचा गौरवपूर्ण निरोप

गडचिरोली : (दि. ३० एप्रिल २०२६): आलापल्ली वनविभागात ३६ वर्षे प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणारे श्री. सुनील पेम्पकवार आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेला सन्मान देत शासकीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या, आलापल्ली यांच्या वतीने त्यांचा स्नेहपूर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी पेम्पकवार यांना शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. उपस्थित सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळातील योगदानाचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. वनविभागातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी विभागाच्या कामकाजात मोलाचा वाटा उचलला असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

सेवानिवृत्ती हा आयुष्याचा नवा टप्पा असून पेम्पकवार यांचे पुढील आयुष्य सुख, समृद्धी व उत्तम आरोग्याने परिपूर्ण राहो, अशी प्रार्थना उपस्थितांनी व्यक्त केली. संपूर्ण आलापल्ली वनविभागाच्या वतीने त्यांना निरोप देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here