वडसा येथे भाजपच्या शक्ती केंद्र प्रमुख व शक्ती केंद्र विस्तारकांचे जिल्हा प्रशिक्षण वर्ग
गडचिरोली :-
आगामी काळात येणाऱ्या नगरपरिषद जिल्हा परिषद विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुका व गावातील बुथाची रचना मजबूत करून प्रत्येक बुथावर पक्षांनी दिलेले कार्यक्रम राबवावे तसेच सर्व नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी तसेच प्रत्येक केंद्राची बैठक लावून आगामी कार्यक्रमाचे नियोजन शक्ती केंद्र प्रमुख व विस्तारकांनी करावे तसेच बुथ मजबूत करण्यासाठी चांगली सक्षम कार्यकारीणी गठीत करावी तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम फ्रेंड्स ऑफ बीजेपी, नमो एप सरल एप , धन्यवाद मोदीजी चे पोस्टकार्ड याविषयीची माहिती कार्यकर्त्यांना देऊन नागरिकांकडून धन्यवाद मोदीजींचे पोस्ट कार्ड भरून घ्यावे तसेच त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्यावे व शक्ति केंद्र व बुथ सक्षम करण्याचा प्रयत्न करावा असे आव्हान भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांनी केले.
भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने बुथ रचना सशक्तीकरण अभियानांतर्गत शक्ती केंद्रप्रमुख व शक्ति केंद्र विस्तारकांचे एक दिवसीय जिल्हा प्रशिक्षण वर्ग देसाईगंज येथील आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात आज दिनांक 5 मार्च 2023 रोजी पार पडले. या प्रशिक्षण वर्गाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अशोकजी नेते,भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे आमदार डॉक्टर देवरावजी होळी आमदार कृष्णाजी गजबे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, जिल्हा संपर्कप्रमुख सदानंद कुथे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालुताई दंडवते, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा वडसाचे तालुकाध्यक्ष राजू जेठांनी उपस्थित होते. या प्रशिक्षण वर्गाला जिल्ह्यातील 300 च्या वर पदाधिकारी, शक्ति केंद्र प्रमुख , विस्तारक उपस्थित होते.