![]()
“‘राष्ट्र प्रथम’चा मंत्र देत कार्यकर्त्यांना सशक्त बनवा; ‘विकसित भारत’साठी सक्रिय सहभागाची गरज – राजे अम्ब्रीशराव महाराज”
:गडचिरोली : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026 अंतर्गत मुलचेरा येथील स्वामी विवेकानंद छात्रावासात भव्य प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत वेगाने प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. “विकसित भारत” घडविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याची सक्रिय भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, कार्यकर्त्यांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजसेवा, जनजागृती आणि राष्ट्रनिर्माणात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
“राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा मूलमंत्र देत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि कर्तव्यभावना रुजवण्यावर विशेष भर दिला. भारतीय जनता पक्ष देशभरात राबवत असलेल्या या महाप्रशिक्षण अभियानामुळे संघटन अधिक मजबूत होऊन कार्यकर्ते सक्षम, शिस्तबद्ध आणि प्रभावी बनतील, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दत्ता, तालुका अध्यक्ष संजीव सरकार, जिल्हा सचिव सुभाष गणपती, प्रदेश सरचिटणीस रेखाताई डोळस, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश गारघाटे, महामंत्री निखिल हलदार, नगरसेवक आशिष पीपरे, दिलीप आत्राम, माजी पंचायत समिती सदस्य बादल शाह, विजय बिश्वास, उत्तम शर्मा, अशोक बडाल, मोंटू सरकार, तपन मल्लिक तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.