हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन सोहळा संपन्न; ग्रामस्थांमध्ये आनंदाची लाट
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत बंदूकपल्ली येथे हनुमान भक्तांसाठी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांच्या पुढाकारातून गावात भव्य आणि दिव्य हनुमान मंदिर उभारले जाणार असून, या मंदिराच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च ते स्वतः उचलणार आहेत.
हनुमान जयंतीच्या पवित्र दिवशी डॉ. कंकडालवार यांच्या हस्ते मंदिर बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी डॉ. कंकडालवार मुलचेरा तालुका दौऱ्यावर असताना बंदूकपल्ली येथील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन गावात हनुमान मंदिर उभारण्याची मागणी केली होती. ग्रामस्थांच्या भावनेचा आदर राखत त्यांनी तत्काळ स्वखर्चाने मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या शब्दाला जागून त्यांनी हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर भूमिपूजन करून संकल्पाची पूर्तता करण्याची दिशा दिली.
या निर्णयामुळे बंदूकपल्लीतील ग्रामस्थ व हनुमान भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी डॉ. कंकडालवार यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
भूमिपूजन सोहळ्याला काँग्रेस नेते हनुमंतू मडावी, प्रमोद गुट्टेवार (तालुका अध्यक्ष, मुलचेरा), अनुप नंदी (उपाध्यक्ष), कालिदास कुसनाके (ता. अध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद), संदीप तोरे, केजीकराव आरके, प्रभाकर मडावी, रणजित आलाम, किशोर आत्राम, हिरामण दिवटीवार, तुळशीराम पेंदाम, जमणादास आलाम, चरणदास आत्राम, किशोर करपेत, बंडू सिडाम, देवराव तलांडे, अनिल कुडमेथे, विजय करपेत, राजेश आलाम, संतोष तोरे, आनंदराव मडावी यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔴 विशेष ठळक :
• स्वखर्चातून मंदिर उभारण्याचा दुर्मीळ निर्णय
• हनुमान जयंतीला भूमिपूजनाने शुभारंभ
• ग्रामस्थांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद
• बंदूकपल्लीत धार्मिक व सामाजिक एकतेला बळ