Home Breaking News भक्तिमय वातावरणात रंगला भागवत सप्ताह; डोंगरगावात भाविकांची उसळलेली गर्दी, डॉ. अशोक नेते...

भक्तिमय वातावरणात रंगला भागवत सप्ताह; डोंगरगावात भाविकांची उसळलेली गर्दी, डॉ. अशोक नेते यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0
32

अशोक नेते यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

आरमोरी : दि. २१ मार्च २०२६ श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त आरमोरी तालुक्यातील मौजा डोंगरगाव (भु.) येथे आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. दि. १८ मार्च ते २६ मार्च दरम्यान सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्यामुळे गावात हरिनामाचा गजर, भागवत कथामृत आणि कीर्तनांनी भक्तीची उंची गाठली आहे.

दि. २१ मार्च रोजी झालेल्या प्रमुख कार्यक्रमाला माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना त्यांनी भागवत सप्ताहाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो आपल्या आचार-विचारांना योग्य दिशा देणारा आणि संस्कार वृद्धिंगत करणारा आध्यात्मिक महोत्सव आहे. आजच्या तणावपूर्ण जीवनात अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे.”
कार्यक्रमादरम्यान भागवत सप्ताह मंडळाच्या वतीने डॉ. नेते यांचा भगवी टोपी व दुपट्टा परिधान करून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे वातावरणात अधिकच उत्साह निर्माण झाला.

या प्रसंगी भाजप जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे, लोचन धोरे, युवा नेते विकास पायडलवार, भास्कर खरकाटे, हरीश राऊत, लोमेश सहारे, बुधाजी सेलोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच गावासह परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून भक्तीभावाने सहभाग नोंदविला.

संपूर्ण सप्ताहादरम्यान अध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव घेत असलेल्या गावकऱ्यांमध्ये एकात्मता, सद्भावना आणि संस्कारांची बीजे रुजताना दिसत असून, हा सोहळा परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here