Home Breaking News “गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार 2.0 मुळे जलक्रांती; राज्यात जलसाठा क्षमतेत विक्रमी वाढ!”

“गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार 2.0 मुळे जलक्रांती; राज्यात जलसाठा क्षमतेत विक्रमी वाढ!”

0
23

 

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या संकल्पनेला वेग; गडचिरोलीसह आदिवासी भागातही योजनेचा प्रभाव

📰महा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क:

मुंबई/गडचिरोली, दि. १९ : राज्यातील जलसुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणारी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना आता जलक्रांतीचे रूप घेत असल्याचे चित्र समोर आले आहे.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात (2.0) राज्यभरात मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा करण्यात येत असून जलसाठा क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्यातील तब्बल ३,२६८ जलसाठ्यांमधून ७.७३ कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला असून त्यामुळे सुमारे ७७ लाख टँकर पाणी साठवण्याइतकी क्षमता पुन्हा निर्माण झाली आहे. या उपक्रमाचा थेट लाभ ११ हजार ५८३ गावांतील १ कोटी ३९ लाख नागरिकांना झाला आहे.

विशेष म्हणजे, ६९ हजार शेतकऱ्यांनी हा गाळ आपल्या शेतात नेऊन जमिनीची सुपीकता वाढवली, यापैकी तब्बल ९१ टक्के शेतकरी वंचित घटकांतील आहेत. त्यामुळे ही योजना केवळ जलसाठा वाढवणारी नसून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही महत्त्वाची ठरत आहे.

२०२५-२६ आर्थिक वर्षात या योजनेला आणखी गती मिळाली असून १,३९८ जलसाठ्यांमधून २.६९ कोटी घनमीटर गाळ उपसा करण्यात आला आहे. यामुळे २६ हजार शेतकऱ्यांना थेट फायदा झाला आहे. भंडारा आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये तर गाळ उपशात ३०० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे.
गोंदिया आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यांमध्येही या योजनेच्या कामांमध्ये लक्षणीय वाढ दिसून येत असून स्थानिक ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन शक्य झाले आहे.

राज्यातील शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून असल्याने जलसाठा वाढविणे आणि भूजल पुनर्भरण करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. संभाव्य एल-निनोच्या पार्श्वभूमीवर जलसुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी शासन या योजनेची अंमलबजावणी पुढेही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here