Home Breaking News महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रम ; अम्ब्रीशराव...

महाशिवरात्री जत्रा निमित्त ‘आई तू माझी होशील का?’ दंडार कार्यक्रम ; अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

0
33

 

अहेरी : तालुक्यातील तेलंगणा सीमेवर असलेल्या प्राणहिता नदीच्या तीरावरील वांगेपल्ली येथील शिव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य जत्रेत महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरलेल्या ‘आई तू माझी होशील का?’ या दंडार कार्यक्रमाचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाविकांसाठी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, “वांगेपल्ली घाट हे दोन्ही राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या हजारो शिवभक्तांच्या सोयीसाठी जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या वर्षाच्या महाशिवरात्रीपूर्वी येथे एका भव्य नवीन ‘शिवमंदिराच्या’ बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.”

जत्रेचे औचित्य साधून रात्री आयोजित करण्यात आलेल्या ‘आई तू माझी होशील का?’ या दंडार कार्यक्रमाने भाविकांचे मनोरंजन केले. पारंपरिक संस्कृतीचे जतन करणाऱ्या या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम, भाजपचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वांगेपल्ली शिव मंदिर समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here