Home Breaking News इंजि. लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

इंजि. लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

0
31

 

आ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार सोहळा ; सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार वाढदिवस

गडचिरोली : राजकारणाकडे समाजकारणाचे माध्यमम्हणून बघणारे नेतृत्व, गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंजि. लिलाधर सुधाकर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, १२ जानेवारी रोजी गडचिरोली शहरात विविध सामाजिक उपक्रमांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने भव्य रक्तदान शिबीर आणि जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून, हा सोहळा जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता सामाजिक भान जपण्यासाठी लिलाधर भरडकर मित्र परिवारातर्फे सकाळी १०:०० वाजता डोंगरे पेट्रोल पंप समोर, पंचवटी नगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक थेंब रक्त, हजारो आशा’ हे ब्रीद घेऊन आयोजित या शिबिरातून संकलित होणारे रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे. युवकांनी मोठ्या संख्येने या जीवनदान मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जनसामान्यांची कामे अधिक गतीने व्हावीत आणि नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींशी थेट संवाद साधता यावा, यासाठी इंजि. लिलाधर भरडकर आणि नगरसेविका सौ. प्रतिभा अविनाश कुमरे यांच्या संयुक्त जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सकाळी ११:०० वाजता संपन्न होणार आहे. हे कार्यालय पंचवटी नगर परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक प्रभावी केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या संपूर्ण सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा अहेरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहणार आहेत. या स्नेहोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गडचिरोलीतील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक इंजि. लिलाधर भरडकर व प्रतिभा कुमरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here