Home आरमोरी नगरपरिषदेचा स्वर्गरथ नेहमी सज्य अवस्थेत ठेवा शहराची लोकसंख्या बघता दुसऱ्या शव वाहना...

नगरपरिषदेचा स्वर्गरथ नेहमी सज्य अवस्थेत ठेवा शहराची लोकसंख्या बघता दुसऱ्या शव वाहना तथा शीतपेटी सोबत अग्निशमन वाहनाची गरज

0
29

भाजपा महामंत्री राहुल तितिरमारे यांची नगर प्रशासना कडे मागणी

 

 

 

आरमोरी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष, नगर सेवकांचा कार्यकाळ संपून सद्या स्थितीत आरमोरी नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी प्रशासक यांच्या कडे आहे.आरमोरी नगरपरिषदेचा शव नेण्यासाठी असलेला स्वर्गरथ मागील दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने व नगरपरिषदेने स्वर्गरथ दुरुस्त न केल्याने नागरिकांना नदीघाटावर शव नेण्यासाठी काटेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आरमोरी नगरपरिषदेची शव नेण्यासाठी असलेला स्वर्ग रथ ताबडतोब दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी भाजपा शहर महामंत्री राहुल तितीरमारे यांनी केली आहे.

आरमोरी शहराची लोकसंख्या जवळपास ३५ हजाराच्या घरात असून आरमोरी शहरात दररोज २ ते ३ लोक मयत होतात. या मयताना घरापासून ते अंतिम संस्कार करण्यात येणाऱ्या जागेपर्यंत नेण्यासाठी स्वर्गरथाची आवश्यकता असते. परंतु नगरपरिषदेचा स्वर्गरथच आजारी पडल्याने नागरिकांना प्रेत नेण्यासाठी इतर साधनांचा वापर करावा लागत आहे. आरमोरी शहराच्या तिन्ही दिशेला तीन स्मशानभूमी असून या स्मशानभूमीचे शहरापासूनचे अंतर तीन ते चार किलोमीटर असल्याने प्रेत नेण्यासाठी आरमोरी नगरपरिषदेने तीन वर्षांपूर्वी स्वर्गरथ आणला. मात्र मागील दोन महिन्यांपासून बंद असलेला स्वर्गरथ नगरपरिषदेने दुरुस्तच केला नसल्याने नागरिकांचा संताप वाढला आहे.

आरमोरी शहरात दोन स्वर्गरथ असून एक स्वर्गरथ हा नगरपरिषदेच्या मालकीचा असून दुसरा स्वर्गरथ खाजगी मालकीचा आहे. खाजगी स्वर्गरथ हा तालुक्यातील इतर खेड्या-पाड्यात शव नेण्यासाठी जात असल्याने आरमोरी शहरवासीयांना नगरपरिषदेच्या स्वर्गरथावर अवलंबून राहावे लागते. आरमोरी शहरातील रामाळा घाट, गाढवी नादिघाट व वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे येथील स्थानिकांना शव नेण्यासाठी विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याने, आरमोरी नगरपरिषद चा असलेला शव वाहन लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर महामंत्री राहुल तितरमारे यांनी केली आहे.

 

*बऱ्याचदा नातेवाईकांना करावा लागतो अडचणीचा सामना*

शहरालगतचे तिन्ही घाट आरमोरी शहरापासून जवळपास ३ किमी अंतरावर आहेत. त्यामुळे प्रत्येक मृतकाचे नातेवाईक मृतदेह नेण्यासाठी स्वर्गरथाची मागणी करतात. एकाच दिवशी एकापेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यास एकाचा मृतदेह नेऊन स्वर्गरथ परत येईपर्यंत दुसऱ्या मृतकांच्या नातेवाइकांना प्रतीक्षा करीत राहावे लागते. याला बराच उशीर होत असल्याने मृतकाच्या नातेवाइकांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन नगर परिषदेने आणखी एक स्वर्गरथ उपलब्ध करून द्यावा तसेच बंद अवस्थेत असणाऱ्या स्वर्ग रथाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाजपा शहर महामंत्री राहुल तितीरमारे यांनी केली आहे.

 

शहरात दुसऱ्या शव वाहना सोबत अग्निशमन वाहनाची गरज

लोकसंख्येच्या दृष्टीने आरमोरी शहर हे मोठे असल्याने व नगरपरिषद आरमोरी मध्ये अरसोडा, पालोरा, रामाळा ही गावे समाविष्ट असल्याने एकाच दिवशी जर दोन-तीन लोक मृत्यू पावत असतील अशावेळी अंत्यसंस्कारासाठी शव नेण्याकरिता बऱ्याच वेळा नातेवाईकांना विविध अडचणीचा सामना करावा लागते. त्यामुळे शहराची लोकसंख्या बघता आरमोरी शहरात नगरपरिषदे द्वारा दुसऱ्या शव वाहनाची गरज असून आपतकालीन जाडपोड सारख्या घटना झाले असल्यास अग्निशमन वाहनाची सुद्धा गरज असल्याने नगरपरिषद्वारा दुसऱ्या शव वाहनासोबत अग्निशमन वाहनाची मागणी भाजपा शहर महामंत्री राहुल तितिरमारे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here