–छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचा उपक्रम
कोरची :-
कोणतेही कार्य करण्याची इच्छा असून चालत नाही, तर ते कार्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि हे सर्व करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाने केलेला आहे., व भविष्यातही करत राहील यात शंका नाही. भर उन्हात येणाऱ्या नागरिकांची तहान भागवून पाण्याच्या रूपात ‘जीवनदानाचे कार्य’ करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाच्या सर्व सदस्यांचे उल्लेखनीय व प्रशंसनीय असल्याचे कोरचीचे जेष्ठ नागरिक मन्सारामजी अंबादे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. या पाणपोईचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक सदरुद्दीन भामानी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज अग्रवाल, देवराव गजभिये, नंदूजी गोबाडे, तुलसी अंबादे ,चेतन कराडे ,लोकमान्य दोनाडकर ,नामदेव नागपुरे, सुरज हेमके, प्रफुल खरवडे, राहुल खरवडे, तसेच बचत गटाचे आदी सदस्य उपस्थित होते.
अशा विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बचत गटा मार्फत करण्यात येईल अशी ग्वाही बचत गटाचे अध्यक्षयांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचे अध्यक्ष नामदेव नागपुरे यांनी तर आभार सचिव सुरज हेमके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.


