Home कोरची कोरची पोलीस स्टेशन येथे भव्य महिला मेळावा, १३३ नागरिकांना विविध दाखले तर...

कोरची पोलीस स्टेशन येथे भव्य महिला मेळावा, १३३ नागरिकांना विविध दाखले तर ११० जणांना विविध वस्तूसह रोपे वाटप

0
30

कोरची

कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरची पोलीस स्टेशन येथे पोलीस दादाला खिडकीचे माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे कलागुणांना वाव मिळावा तसेच शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोरची पोलीस स्टेशन येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन गुरुवारी १४ मार्च रोजी करण्यात आले होते. यामध्ये १३३ नागरिकांना विविध दाखले तर ११० जणांना विविध वस्तूसह रोपे वाटप करण्यात आली.

          या मेळाव्याचे अध्यक्ष नगराध्यक्ष हर्षलताताई भैसारे व उद्घाटक नवरगाव ग्रामपंचायत सरपंच कौशल्या काटेंगे ह्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून आपला दवाखाना डॉ. शितल रामटेके, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ प्रमिलाताई काटेंगे, महाराष्ट्र कन्या पुरस्कार प्राप्त तथा समाजसेविका कुमारीताई जमकातन, तालुका मुक्तिपथ संघटक निळाताई किनाके, कृषी सहाय्यक बी जी अंबोरकर, ग्रामीण रुग्णालय क्षयरोग रोगतज्ञ प्रमोद सातपुते, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. एन डी लोहारे, ग्रा. रु. आरकेएसके निशा साखरकर, हेमंताताई शेंडे, तसेच परिसरातील नगरसेविका, सरपंच, पोलीस पाटील, महिला बचत गट अध्यक्ष यावेळी उपस्थित होते.

           मेळाव्यात उपस्थित गरजू ३० महिलांना प्लास्टिक टोपली, २० नग साडी, ३० जांभूळ रोप, ३० आवळा रोप तसेच V L E मार्फत नागरिकांना ४८ आधार कार्ड, २० उत्पन्नाचे दाखले, ८ जात प्रमाणपत्र, ४ नॉनक्रिमिलेअर, ३ रहिवासी, ५० सातबारा दाखल्यांचे वाटप करण्यात आले. मेळाव्यात सांस्कृतिक, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते यामधील प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली.

          मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. त्यानंतर प्रास्ताविकेत पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांनी महिला मेळाव्याच्या उद्देश सांगून पोलीस स्टेशन कोरची परिसरातील महिला व पुरुषांना शासकीय योजना, पोलीस दादालोरा खिडकीचे महत्वाबद्दल आणि महिलांच्या अधिकार याविषयी माहिती दिली. तसेच पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे यांनी महिला मेळाव्याच्या उद्देश सांगून महिला सक्षमीकरण करण्यासाठी पोलीस दलामार्फत महिलांकरिता राबविण्यात येणारे विविध प्रशिक्षण व उपक्रम याबद्दलची माहिती दिली. तसेच उपस्थित मान्यवरांनी आपल्या मुलांना कसे घडवावे आदिवासी बांधवांनी नशा पासून दूर राहावे माओवादी विचारसरणी पासून सर्व नागरिकांनी दूर राहावे असे मार्गदर्शन यावेळी केले.

           सदर मेळाव्याचे संचालन पोलीस उपनिरीक्षक कृष्णा साळुंखे तर आभार पोलिस हवालदार अशोक घाटघुमर यांनी केले. उपस्थित सर्व नागरिकांना उत्तम व रुचकर जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता झाली. सदर मेळावा शांततेत पार पाडण्याकरिता जिल्हा पोलीस अधिकारी तसेच पोलीस अंमलदार, एस आर पी एफ अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here