Home आरमोरी आरमोरी पॅटर्न मध्ये उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या महसुल कर्मचारी ,शाळा,शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न….

आरमोरी पॅटर्न मध्ये उकृष्ठ कामगिरी करणाऱ्या महसुल कर्मचारी ,शाळा,शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न….

0
17

 

 

भविष्यात सुद्धा आरमोरी पॅटर्न राबवून विद्यार्थ्यांना लाभदायक काम करा…..ओमकार पवार यांचे प्रतिपादन

 

आरमोरी…..

 

दिनांक 14.02.2024 ते 29.02.2024 या कालावधीत राबविण्यात आलेल्या शिबिराच्या अनुषंगाने उकृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचारी,शाळा,आणि शिक्षकांचा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरमोरी पॅटर्न चा भविष्यात सुद्धा लाभ विद्यार्थांना कसा करून देता येईल यासाठी सर्वांनी कासोसीचे प्रयत्न करावेत आहे प्रतिपादन सन्मान सोहळ्या प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मा.ओमकार पवार यांनी केलं.

….. नुकतेच परिक्षाविधिन कालावधी मध्ये आरमोरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करत असताना विविध योजनांचा लाभ सर्व घटकांना तत्काळ कसा देता येईल यासाठी आरमोरी पॅटर्न च्च्या धर्थीवर मिशन जात प्रमाणपत्र ,तथा निराधार लाभार्थी,श्रावण बाळ लाभार्थी,विविध आणि यो लाभ सर्वसामान्यांना देण्याचा मानस असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्नी.श्रीहरी माने नायब तहसीलदार ललितकुमार लाडे हरिदास दोनाडकर,सौ. उत्तरा राऊत,धनराज वाकुलकर , चंदुजी प्रधान आदी उपस्थित्त होते.

आरमोरी पॅटर्न मध्ये उकृष्ट काम करणाऱ्या 2 कोतवाल,5 शिक्षक,36 शाळा ,त्यासोबत सामाजिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विशेष मोहीम अभियान राबविण्यात उकृस्ट काम करणाऱ्या मध्ये 3 कोतवाल ,आणि 6 तलाठ्यांच्या सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमादरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओमकार पवार यांचा सुद्धा महसूल कर्मचारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.तर पदोन्नती प्राप्त महसूल कर्मचाऱ्या सुद्धा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरमोरी तहसील कार्यालय चे सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here