Home कोरची आरक्षणानेच नव्हे, तर बुद्ध स्विकारल्यामुळे प्रगती झाली

आरक्षणानेच नव्हे, तर बुद्ध स्विकारल्यामुळे प्रगती झाली

0
28

 

 

डॉ.राजरत्न आंबेडकर – धम्म प्रबोधन कार्यक्रमात विविध विषयांवर मार्गदर्शन

 

कोरची

आंबेडकरी अनुयायांनी जी काही प्रगती या स्वतंत्र देशात केली ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील आरक्षणानेनेच नव्हे, तर 1956 ला स्विकारलेल्या बुद्धाच्या धम्माने झाली. कारण त्यामुळे आमच्या जगण्यात आमुलाग्र बदल झाला. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड फेलोशिप आँफ बुद्धिस्ट च्या स्टँन्डिंग कमेटीचे सचिव डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे.

        ते कोरची येथे दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया तालुका शाखा कोरचीच्या वतीने आयोजित धम्म प्रबोधन कार्यक्रमात अध्यक्ष तथा मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, बुद्ध धम्म न स्विकारलेल्या अनुसुचित जातीतील इतर बांधवांना संविधानातील सर्व सवलती लागु असतांना सुद्धा ते बौद्धांपेक्षा जे काही मागे पडलेले दिसतात त्यांचे कारण शोधावे आणि बुद्धाच्या वाटेने यावे. परंतु आरक्षणाची विभागणी करण्याची मागणी करू नये. असे आवाहन सुद्धा राजरत्न आंबेडकर यांनी केले.

        कोरचीत डॉ राजरत्न आंबेडकर यांचे पहिल्यांदाच आगमन झाले त्यामुळे येथिल बौद्ध बांधवानी लुम्बीनी विहारातुन युवा बौद्ध बांधवांनी शहरातून मोटारसायकलने भव्य रॅली काढून जय घोषात डॉ. राजरत्न आंबेडकरांचे स्वागत केला. यानंतर मुख्य बाजार चौक येथील बोद्ध झेंड्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला डॉ राजरत्न आंबेडकरांनी अभिवादन केला. यानंतर बाजार चौकातून बँडचा पथकात समता सैनिक दलानी सलामी दिली आणि समता सैनिक दलाच्या सुरक्षेत राजरत्न आंबेडकर साहेब धम्मभूमी कार्यक्रम स्थळी पोहोचले तिथे सुद्धा त्यांचं फुलांच्या वर्षाव व स्वागत गीताने झाले.

         बुद्धभूमीवर आयोजित या धम्म प्रबोधन कार्यक्रमाचे उदघाटन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते यांचे हस्ते करण्यात आले. विशेष अतिथी म्हणून नागपूर विभागाचे अध्यक्ष विजय बन्सोड, जिल्हाध्यक्ष धर्मानंद मेश्राम, नगर पंचायतच्या अध्यक्षा हर्षलता भैसारे, उपाध्यक्ष हिरा राऊत, छत्तीसगड चे प्रदेशाध्यक्ष एम.डी.वालदे, महा. राज्य संघटक वैभव धबडगे, विभागीय उपाध्यक्ष अशोक इंदुरकर, महिला महासचिव यशोधरा नंदेश्वर, प्रतिनिधी दर्शना शेंडे, बौद्ध समाज तालुका कोरचीचे अध्यक्ष अशोक कराडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास साखरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जिल्हाध्यक्ष सतीश इंगोले, दिनाजी खाडे, गडचिरोली जिल्हा पदाधिकारी हंसराज लांडगे, काका गडकरी, विभा ऊमरे, राधा नांदगाये, डॉ. विनोद चहारे, डॉ. स्वप्निल राऊत आदि उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे संचालन तालुका शाखेचे सल्लागार प्रा. देवराव गजभिये, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष किशोर साखरे तर कोषाध्यक्ष रमेश शहारे यांनी मानले. सायंकाळला अल्पोहार तर रात्रों सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली. यशस्वीतेसाठी चंद्रशेखर अंबादे, चंदु वालदे, चेतन कराडे, राहुल अंबादे यांचेसह दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया, रमाई महिला मंडळ, बौद्ध समाज व बुद्धिस्ट युवा संघटना तालुका बौध्द समाजच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातील दोन ते तीन हजार अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here