Home कोरची पोलीस स्टेशन कोरची कडून, जनजागरण मेळाव्याचे औचित्य साधून,कबड्डी व हॉलीबॉल स्पर्धा चे...

पोलीस स्टेशन कोरची कडून, जनजागरण मेळाव्याचे औचित्य साधून,कबड्डी व हॉलीबॉल स्पर्धा चे आयोजन

0
33

‌‌

 

दि.22/11/2023 ते दि.23/11/2023 रोजी पोलिस स्टेशन कोरची येथे भगवान बिरसा मुंडा हॉलीबॉलब स्पर्धा व वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व भव्य जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आले होते . सदर स्पर्धेमध्ये पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील व्हॉलीबॉल खेळाचे 12 संघ व कब्बडी खेळाचे 20 संघ सहभागी झाले होते.

# *हॉलीबॉल स्पर्धेमध्ये*

1) प्रथम क्रमांक कोरची संघाणी पटकवीला असुन 3000/-रु व प्रशस्तीपत्र

2 ) द्वितीय क्रमांक मोहगांव संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 2000/- व प्रशास्तीपत्र

3 ) तृतीय क्रमांक कुमकोट संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 1000/- रु.व प्रशास्टिपत्र देण्यात आले.

# *कब्बड़ी स्पर्धाचे*

1) प्रथम क्रमांक लेकुरबोडी संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 3000/- रू.,

2) द्वितीय क्रमांक आलिटोला संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 2000/- रू.,

3) तृतीय क्रमांक बोडेना संघाने पटकवीला असुन रोख पारितोषिक 1000/- रु.मा. मानायवरांचे हस्ते प्रमाणपत्रे देउन सन्मानित करण्यात आले.

तसेच भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले . पोलीस स्टेशन कोरची हद्दीतील बहुसंख्य उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनेचे माहिती, विभागाचे प्रमुख अधीकारी यांचे कडून देण्यात आले व विशेष मार्गदर्शन करून योजनेचे लाभ घेणेबाबत मा प्रशांत गडडम तहसीलदार यांचे कळून आव्हान करण्यात आले.

 

सदर जनजागरण मेळावा कार्यक्रमाला मा. प्रशांत गडम तहसीलदार कोरची, मा. राजेश फाये संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती कोरची, मा.मसराम तालुका कृषी अधिकारी कोरची मा. डाँ.मनोरे नेत्र चिकित्सक ग्रा. रुग्णालय.

मुख्यद्यापक उमाकांत ढोक शा.आ.शाळा कोरची, कु. निळा किन्नके मुक्तीपथ कोरची, इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

तसेच मेळाव्याला उपस्थित नागरिकांना खालीलप्रमाणे योजनेचे लाभ देण्यात आले….

1) कास्ट :-4

2) आधारकार्ड :-

3) आभा कार्ड :-25

4) आयुष्य मान कार्ड :-3

5) उत्पन्न दाखला :-10

6) नेत्र तपासणी :-18

7) कृषी विभाग :-54

8) भारत गॅस वाटप :-9

9) ज्वारी बियाणे वाटप :-20 (4 किलो प्रति बॅग प्रमाणे )

10) साड्या वाटप :-100 (महिलांकरिता )

सर्व खेळाडूंना व मेळाव्याला उपस्थित नागरिकां करिता चाय, नास्ता व उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जनजागरण मेळाव्याला पोस्टे हद्दीतील 250 ते 300 नागरिक उपस्थित होते,

सदर कार्यक्रमाचे नियोजक व मार्गदर्शन पो.नि. अमोल फरतडे, तसेच सर्व पोलीस प्रशासनाने खूप मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाळले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here