Home आरमोरी रवी येथील युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खुर्च्यांचे वाटप जिल्हा बँकेचे व्यवस्थापक...

रवी येथील युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खुर्च्यांचे वाटप जिल्हा बँकेचे व्यवस्थापक राजू सोरते व नंदू नाकतोडे यांच्या पुढाकार:–

0
29

आरमोरी :-

-तालुक्यातील रवी या गावातील अनेक युवक हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि सराव करीत असल्यामुळे येथील वाचनालयात त्यांना बसण्याची व्यवस्था नव्हती त्यांना बसण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी नुकतेच खुर्च्यांचे वाटप करण्यात आले। रवी येथील अनेक युवकांनी एकत्र येऊन रवी येथील एका खोलीमध्ये वाचनालय सुरू केले पण बसण्यासाठी त्या ठिकाणी खुर्च्याची सोय नव्हती यासाठी या गावातील तरुण युवकांनी आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे यांना सांगितले असता त्यांनी सदर बाब ही गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक श्री राजू सोरते यांच्या कानावर ही गोष्ट टाकली असता श्री राजू सोरते बँक व्यवस्तपक यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रवी गावातील या छोट्याशा वाचनालयासाठी आणि युवकांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यासाची तयारी करण्यासाठी त्या गावी स्वतः जाऊन या वाचनालयातील युवकांना बसण्यासाठी खुर्च्या घेऊन दिल्या त्यामुळे या युवकांची वाचनाची सोय तयार करण्यात आली आणि यासाठी पुढाकार श्री नंदू नाकतोडे यांनी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून घेतला त्यामुळे रवी गावातील अनेक युवकांनी त्यांचे आभार मानले तसेच ज्यांनी हा खुर्च्यांची सोय करून दिली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक श्री राजू सोरते यांचे त्यांनी सुद्धा स्वागत करून त्यांचे आभार मानले आहेत यामुळे अनेक युवकांना आता स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी वाव मिळेल आणि भविष्यात ते नोकरी लागतील असा आशावाद या खुर्च्या देताना श्री नंदू नाकतोडे व राजु सोरते यांनी व्यक्त केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here