कोरची -: येथील स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची ,पंचायत समिती कोरची ” तंबाखमुक्त शाळा ” प्रश्नमंजुषा व विचार कार्यक्रमामध्ये शाळा अव्वल .
मुक्तीपथ अभियान अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा व विचार कार्यक्रम गडचिरोली , मुक्तीपथ अभियान अंतर्गत विजेत्या शाळांना पत्रकार भवन , धानोरा रोड, गडचिरोली येथील कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद टेंभूरकर, आरती चांदेकर, प्रमोदिनी काटेंगे , विद्यार्थीनी मोनाली सिंद्राम ,राशी बांगरे, सरवरी गावतुरे यांचे खूप खूप अभिनंदन. पद्मश्री मा.अभय बंग, मा.उज्ज्वल निकम साहेब शिक्षणाधिकारी गडचिरोली यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. पंचायत समिती कोरची येथील गटविकास अधिकारी मा.राजेश फाये साहेब ,गटशिक्षणाधिकारी मा.अमित दास सर, मा.हिराजी रामटेके सर केंद्र प्रमुख , केंद्र कोरची यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
मुक्तीपथ अभियानाच्या समन्वयक निळा किन्नाके यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यशस्वितेकरीता कांता साखरे, मेघा बुराडे, मारोती अंबादे, महेश जाळे ,आरती चांदेकर, प्रमोदिनी काटेंगे मु. अ. अरविंद टेंभूरकर,विनोद भजने यांनी सहकार्य केले. शाळेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


