आज दि. 4/10/2023 रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग, गडचिरोली येथे सादर करण्यात आले. प्रकल्प अधिकारी हे जिल्हा स्तरीय कन्व्हर्जंस समितीचे सदस्य/सचिव आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हे आराखडे जिल्हा कन्व्हर्जंस समितीकडे हस्तांतरीत व्हावे आणि या उपजिवीका आराखड्यांची अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शासनाकडे उपजिवीका आराखडे सादर करण्यात आले.
नैसर्गिक संसाधनाचा वापर करून ग्राम सभांनी शाश्वत उपजिवीका तयार करावी आणि ग्राम सभांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हे उद्देश पुढे ठेऊन उपजिवीका आराखडे तयार करण्यात आलेले आहेत, सदर आराखडे हे पुढील 10 वर्षांचा कालावधी लक्षात घेता तयार करण्यात आलेले आहेत. उपजिवीका आराखडे सादरीकरण दरम्यान ग्राम सभा कोसरी, थोटेबोडी आणि येंगाडा येथील अध्यक्ष, सचिव उपस्थित होते तसेच विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे प्रतिनिधी व एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपजिवीका आराखडे सादर करणारे ग्राम सभांची नांवे खालीलप्रमाणे
1) थोटेबोडी 2) कोसरी 3) येंगाडा 4) कोरेगांव 5) खडकी 6) जांभळी 7) पाठणवाडा 8) सुकाळा 9) मेंढेबोडी 10) मोहटोला.


