Home कोरची आश्रम शाळा कोटरा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

आश्रम शाळा कोटरा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

0
32

 

*कोटरा

:- अनुदानित मासाहेब आश्रम शाळा कोटरा येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक यशवंत दरवडे,प्रमुख मार्गदर्शक म्हणून माध्यमिक मुख्याध्यापक सुनील अवसरे,अधीक्षक मुकेश हरडे, माध्यमिक शिक्षक भरत लंजे तर प्रमुख अतिथी म्हणून सुधाकर कामडी, रमेश शहारे, अरविंद काशिवार,नमो मेश्राम,गणेश हीचामी,देवानंद पुराणकर,खीरेश ढवळे,घनश्याम वणवे,भूपेश कामडी,सुशील मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला मल्यार्पन करून डॉ.सर्वपल्ली यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नमो मेश्राम यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश शहारे यांनी व आभार प्रदर्शन घनश्याम वणवे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री हितेश्वरी नैताम व मंत्रिमंडळातील रिना तुलावी, वर्षा कचलामी,प्रतिमा टेकाम यांनी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here