तालुक्यात अवैध दारू विक्रीसह सट्टापट्टी बॅटिंग जोरात सुरू, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा याकडे दुर्लक्ष कशामुळे नागरिकांना प्रश्न ?
कोरची
गडचिरोली जिल्ह्यातील उत्तर टोकावरील छत्तीसगड सीमेलगत कोरची तालुका हा अतिशय संवेदनशील अतिदुर्गम नक्षलग्रस्त म्हणून तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजारो जनावरांची तस्करी होत आहे दररोज सहा ते सात ट्रक या तालुक्यातून कत्तलीसाठी हैदराबाद नागपूर अशा शहरात जात आहेत. याशिवाय तालुक्यामध्ये दारू विक्री व सट्टापट्टी खुलेआम पद्धतीत सुरू आहे.
कोरची तालुक्यामध्ये अनेकदा जनावर तस्करंबाबत लोकमतनी बातम्या प्रकाशित करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस प्रशासनाकडून झालेली नाही अनेकदा नक्षलग्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील वन विभागाच्या जमिनीत जनावर तस्करीचे मोठ-मोठे अड्डे बनवून तस्करी सुरूच आहेत. तालुक्यातील गोंदिया, छत्तीसगड सीमेलगत ग्रामीण भागातील जंगल परिसरात जनावर तस्करींची सात ते आठ मोठे अड्डे आहेत. कोटरा, हित्तापाडी, घुगवा, बोगाटोला, हेटाडकसा व गोंदिया जिल्ह्यातील जपकसा अशा ठिकाणी तस्कर आपले अड्डे बनवून ठेवले आहेत. रात्रोच्या अंधाराचा फायदा घेत रात्रोला पोलिसांना चकमा देत तस्कर जनावरांची तस्करी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. छत्तीसगड येथील जनसेवा संघटन प्रदेश अध्यक्ष विजय प्रकाश गुप्ता यांनी कोरची तालुक्यातील अवैध धंद्यांचा पर्दाफाश केला आहे विजय प्रकाश गुप्ता यांनी कोरची शहरात खुलेआम सुरू सट्टा पट्टी अवैध दारू विक्री सह हजारो जनावरांची कत्तलीसाठी जाणाऱ्या अड्ड्यावरची व्हिडिओ बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी निदर्शनास आणून दिले आहे.
जनावर तस्करांचे अड्डे तालुक्यातील गोंदिया जिल्हा व छत्तीसगड राज्य सीमेलगत आहेत कोरची पोलिसांना जनावर तस्कर अड्डाची माहिती मिळाली कि लगेच तस्कर गोंदिया जिल्ह्याच्या अड्ड्यामध्ये जनावरे शिफ्ट करतात अशीच घटना कालच्या तारखेत घडलेली आहे विजय प्रकाश गुप्ता यांनी ज्या कोटरा येथील हित्तापाडी व बोगोटाला या गावाच्या जंगल परिसरात जनावराच्या अंड्याची व्हिडिओ बनवून अधिकाऱ्यांना पाठवली लगेच त्याच रात्री तेथील जनावरे गोंदिया जिल्ह्याच्या सीमेलगत च्या अड्ड्यावर शिफ्ट करण्यात आले त्यामुळे विजय प्रकाश गुप्ता यांनी पोलीस प्रशासन व वन विभागाच्या अधिकारी यांनी वेळेवर कारवाई करून मुक्या जनावरांना सोडवले असते परंतु त्यांनी तसं केलं नाही त्याबद्दल त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून कडक कारवाईसाठी मागणी केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार तस्करांकडून विजय प्रकाश गुप्ता यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचेही सांगण्यात येत आहे त्यांनी जनावरांच्या अड्ड्यावर जाऊन स्वतः व्हिडिओ करून त्या मुक्या जनावरांची व सट्टा-पट्टी कापण्याची व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे. तर काही तस्कर व काही अवैध धंद्या चालवणाऱ्या लोकांकडून सेटिंग साठी सुरुवातीला फोन आले सेटिंग होत नसल्याने आता धमकीचे फोन विजय प्रकाश गुप्ता यांना येत आहेत.
कोट
अनेकदा नाकेबंदी करून जनावर तस्करी करणाऱ्या तस्करांची ट्रक पकडून कारवाया केल्या आहेत जनावरांची तस्करी ही तालुक्यातील अतिदुर्गम अतिसंवेदनशील जंगल भागातून रात्रोच्या दरम्यान करीत असतात त्यामुळे वारंवार त्यांच्या अड्ड्यावर नक्षल दृष्ट्या केव्हाही जाता येत नाही. तसेच सट्टापट्टी व अवैध दारू विक्रीवर वारंवार कोरची शहरात धाडी टाकून अनेक कारवाया केलेले आहेत.
अमोल फडतरे
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन कोरची


