कोरची:- स्थानिक रियल कॉन्व्हेंट कोरची येथे सोशल एज्युकेशन मुव्हमेंटची तालुका कोरची च्या वतीने वैचारिक चर्चा संपन्न झाली.
सदर सभेला सेम चे कार्यकर्ते देवेंद्र सोनपिपरे, शामराव रामटेके, रुपेंद्र लाडे व श्याम रामटेके यांनी सोशल एज्युकेशन मुव्हमेंटची गरज व कार्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन उपस्थित जनसमुदायाला केले. व गावोगावी लोकशिक्षक निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला जीवन भैसारे, आनंद मेश्राम, मनोज टेंभुर्णे, शालिक कराडे, सुदाराम सहारे, किशोर नंदेश्वर, अविनाश हुमणे, चंद्रशेखर वाल्दे, चेतन कराडे, अंकालू नंदेश्वर, महेश लाडे, दिनेश अंबादे, प्रशांत कराडे, छाया साखरे, छाया सोरदे, वंदना टेंभुर्ने, चंद्रपाल भैसारे, व कोरची नगरातील तथा तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी श्याम रामटेके यांचा मुलगा बोधिरामटेके यांची स्पेन, स्वीडन, नार्वे, इंग्लंड या देशात उच्चशिक्षणासाठी जागतिक स्तरावरची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याने बौद्ध समाज कोर्चीच्या वतीने श्याम रामटेके सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून मंगल कामना देण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सेमचे तालुका संयोजक चंद्रशेखर अंबादे यांनी तर उपस्थित मान्यवरांचे आभार रमेश शहारे यांनी मानले.


