Home आरमोरी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून साकारले जोगीसाखरा येथे एक गाव एक वाचनालय

पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या संकल्पनेतून साकारले जोगीसाखरा येथे एक गाव एक वाचनालय

0
24

 

आरमोरी पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

आ.गजबे यांच्या हस्ते वाचनालयाचे उदघाटन

आरमोरी-दिनांक १६ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन आरमोरी अंतर्गत मौजा जोगीसाखरा येथे मा.पोलिस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे , अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सर, अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतीश देशमुख व मा. उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४० विद्यार्थी बसण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण व उदघाटन सोहळाचे आयोजन करण्यात आले होते.

गडचिरोली पोलीस दल दादालोरा खिडकी अंतर्गत पोलीस स्टेशन आरमोरी व ग्रा.पं.जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जोगीसाखरा येथे एक गाव -एक वाचनालयाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आ.कृष्णा गजबे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुनानक ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष हिरालाल मोटवानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वडसा वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी मनोज चव्हाण, आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम,आरमोरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक,प्रदेश काँग्रेसचे सचिव नामदेव किरसान,जोगीसाखरा ग्रामपंचायतचे सरपंच संदीप ठाकूर होते तर प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष दिलीप घोडाम, आरमोरी न.प.चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, पंकज खरवडे,नंदू नाकतोडे,पत्रकार रुपेश गजपुरे, हरेंद्र मडावी ,भीमराव मेश्राम, भीमराव ढवळे,सुरेश कांबळे,भाकरोंडीचे सरपंच विलास उसेंडी,कुलकुली ग्रा.प.चे सरपंच विलास बावणे,ज्योती घुटके,ज्योती सोनकुसरे, सरपंच कन्नाके सरपंच कुमरे, सरपंचा पेंदाम, सरपंचा सुलभा गेडाम, प्राचार्य खरकाटे सर, प्राचार्य बुल्ले सर, गुरुदेव कुंमरे ,करिष्मा मानकर, स्वप्निल गरफडे, अश्विनी घोडाम, पोलीस पाटील राधा सेडमाके,गोपाल डोनाडकर, शालीक मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याअगोदर ग्रंथ दिंडी काढुन गावात मिरवणुक काढण्यात आली. सदर कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना पोलिस दादालोरा खिडकी मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनाची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे उदघाटक आ.गजबे म्हणाले की,नियमित वाचनाने ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करू शकतात. एक गाव- एक वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता वाचनाची चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे वाचन केल्यास प्रशासनातही उच्च पदावर सेवारत होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी या वाचनालयाच्या माध्यमातून संधीचे सोने करून आपले भवितव्य उज्वल करावे. असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे आयोजक पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक म्हणाले की, दुर्गम व अतिदुर्गम भागात कार्यरत असलेले विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धिक कलागुणांना वाव मिळावा व वाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धा परीक्षेची ओळख निर्माण व्हावी, तसेच त्यांच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी. यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या संकल्पनेतून “एक गाव- एक वाचनालय” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तर प्रमुख अतिथी नामदेव किरसान यांनी, सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होते असे सांगितले. तर स.वनसंरक्षण अधिकारी चव्हाण यांनी गावातील वाचनालयाचा सर्व विद्यार्थ्यांना उपयोग होऊन व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून गावामध्ये जास्त जास्त अधिकारी घडतील असे अपेक्षा त्यांनी केली.

सदर सार्वजनिक वाचनायला मा. मंत्री श्री धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन पोलीस विभागाचे कौतुक केले .

तत्पूर्वी पोलीस स्टेशन आरमोरी व ग्रा.प.जोगीसाखरा यांच्या संयुक्त विद्यमाने जोगीसाखरा गावातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.ग्रंथदिंडीत व कार्यक्रमात जोगीसाखरा येथील सर्व शाळेतील शिक्षकवृंद,विद्यार्थी विद्यार्थिनी,गावातील सर्व पुरुष-महिला,विविधग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच,ग्रा. प.सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, गृहरक्षक दलाचे जवान,पोलीस पाटील,पोलीस कर्मचारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी,पत्रकार मोठया संख्येने सहभागी झाले होते. व कार्यक्रमाची सांगता भोजनाने झाली.

कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक श्रीकृष्णा खरकाटे, प्रास्ताविक पोलीस नाईक अशोक ठाकरे तर आभार पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व गावातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here