गडचिरोली-
समाज कार्यात सदैव अग्रेसर राहुन गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणारे गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष छगन शेडमाके यांनी परत आपल्यातील माणुसकीचा परिचय देत सामाजिक उत्तरदायीत्व निभवित देसाईगंज येथील तब्बल ५० गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप केले.
शेडमाके यांनी आतापर्यंत अनेक निराधार निराश्रीत लोकांना आर्थिक मदत करून सामाजिक कार्यात आपली अनोखी छाप पाडली आहे. पहिले समाजकारण हे ध्येय समोर ठेवून आर्थिक अडचणीमुळे अनेक गोरगरीबांची मुले शैक्षणिक फी भरू शकत नाहीत, वाढलेली कंबरतोड महागाई, वाढती बेरोजगारी अनेकांचे आयुष्य उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरू लागली असता गोरगरीब,गरजुंना आपल्याने शक्य ती मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देसाईगंज शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष पिंकु बावणे यांच्या उपस्थितीत त्यांनी गरजु महिलांना ५० साड्यांचे वाटप केले.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

