तालुका काँग्रेस कमिटी कार्यालय आरमोरी येथे सर्वसामान्य बहुजन समाजाला नवीन जीवन देणारे, गरीब, शोषित आणि वंचितांचे कैवारी, थोर समाजसुधारक, लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करून त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आले, यावेळी कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक मिलींद खोब्रागडे,जिल्हा किसान कॉंग्रेस अध्यक्ष वामन सावसाकडे, अनिल किरमे ,दिवाकर पोटफोडे, मनोज बोरकर, मेघराज राऊत,भोलेनाथ धानोरकर, रुपेश जौंजालकर,अजय नारनवरे,मंगेश पाटील, खेमराज चटाळे, नीलकंठ सेलोकर, गुड्डू कंदूकवार, मयूर मेश्राम इतर कार्यकर्ते उपस्थित होते.


