Home देसाईगंज वडसा काँग्रेस नेते राहुल गांधीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना फळवाटप

काँग्रेस नेते राहुल गांधीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुग्णांना फळवाटप

0
17

मोक्याच्या ठिकाणी वृक्षारोपण,शहर काँग्रेसचा उपक्रम

देसाईगंज-
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष तथा भारत जोडो याञेच्या माध्यमातून देशाच्या राजकारणात खळबळ माजवून देणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करून व मोक्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.
देसाईगंज शहर काँग्रेसच्या वतिने हा उपक्रम देसाईगंज शहर काँग्रेसच्या पुष्पा कोहपरे तसेच माजी नगरसेवक हरीष मोटवाणी यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला.यावेळी ओबीसी सेलचे जिल्हा सचिव मनोज ढोरे,माजी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पिंकूभाऊ बावणे,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अरुण कुंभलवार,सुनील चिंचोळकर, महिला शहर अध्यक्ष यामिना कोसरे,अनुसूचित महिला सचिव समिता नंदेश्वर,रजनी आत्राम,बेबी पठाण,सफीका शेख,विमलबाई मेश्राम, कांताबाई भोयर,कमला डोनारकर,पूजा कोल्हे,कमला मेश्राम,संगीता गणवीर,शालू मेश्राम,पुष्पा मेश्राम,ताराबाई कांबळे,शालिनी मेश्राम,सुनंदा बगमारे,वच्छला मेश्राम, कलाबाई भुते,प्रियंका वानखेडे दिव्या बोदोले,इंद्राबाई भैसारे, शुभम तोडकर आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here