Home कोरची श्रीराम विद्यालय येथे क्ले मॉडलिंग प्रशिक्षण; विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मातीपासून विविध कला

श्रीराम विद्यालय येथे क्ले मॉडलिंग प्रशिक्षण; विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मातीपासून विविध कला

0
30

 

कोरची
स्थानिक श्रीराम विद्यालय येथे ‘कला विश्व’ या विविध कलाकृतीच्या कार्यशाळेसाठी कला प्रशिक्षण आयोजित केले होते. सदर प्रशिक्षण नगरपंचायत कोरची द्वारा चंद्रा आर्टस या संस्थेच्या माध्यमातून देण्यात आले प्रशिक्षण कार्यशाळेत इयत्ता पाचवी व सहावीच्या मुला मुलींनी सहभाग घेवून माती पासून विविध मुर्त्या तयार केल्या व इतर विविध कला साकारल्या ही कार्यशाळा निशुल्क असून प्रशिक्षणार्थींना लागणारे साहित्य मोफत पुरविण्यात आले होते.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात विविध कलांची रुची निर्माण होऊन त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव मिळेल व त्यांच्या कलेची जोपासना होऊन त्यांना शालेय जीवना व्यतिरिक्त भविष्यात त्यांना या कलांचा फायदा व्हावा हा ‘कला विश्व’ प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. प्रशिक्षण कार्यशाळेत शाळेचे मुख्याध्यापक डी एन गजभिये, पर्यवेक्षक एन के गोबाडे, शिक्षक आर एल भानारकर, एस बी मेश्राम, एस के खोब्रागडे व चंद्रा आर्टस कला विश्व चे प्रशिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here