Home आरमोरी आरमोरी नगर परिषदेला नियमित मुख्याधिकारी द्या मंजूर घरकुल लाभार्थी आर्थिक विवंचनेत –...

आरमोरी नगर परिषदेला नियमित मुख्याधिकारी द्या मंजूर घरकुल लाभार्थी आर्थिक विवंचनेत – नगरसेवक मिलिंद खोब्रागडे

0
28

आरमोरी हे पूर्वी जिल्ह्यातील मोठे ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात होते. त्यानंतर आरमोरी हे नगरपरिषद म्हणून अस्तित्वात आले. नगरपरिषद झाल्याने जनतेची कामे ही जलद गतीने होतील अशी अपेक्षा होती, परंतु उलट झालं अनेकांना आपल्या कामांसाठी रोजच येरझारा घालाव्या लागत आहेत. अनेकांना आपल्या समस्यांचा निराकरण करून मिळत नाही, तर कधी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावते, तर कधी स्वच्छतेचे, कधी नाल्यासफाईचा, अशा अनेक समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागत आहे. अशा कठीण परिस्थितीचा सामना करीत असतानाच नगरपरिषदला कार्यरत असणाऱ्या मुख्याधिकारी सलामें मॅडम सुट्टीवर गेल्याने त्या जवळपास तब्बल चार – पाँच महिने त्या हजर राहत नसल्याने, आरमोरी नगरपालिकेला प्रभारी मुख्याधिकारी म्हणून गडचिरोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची नेमणूक आरमोरील नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली, त्यांचे ऑर्डर 13/03 2023 ला झाली त्या तारखेपासून ते आज 27/03/2023 पर्यंत फक्त एक दिवस मुख्याधिकारी नगर पालिकेला हजर झाले. आरमोरील नगरपालिकांच्या कामकाज पाहता जर मुख्याधिकारी 12 ते 13 दिवस गैर राहत असेल तर सर्वसामान्य माणसांचे काम पूर्ण कसे होणार. शहरातील नागरिक आपल्या कामासाठी नित्यनेमाने रोज आपली रोजी बुडवून किंवा आपली दैनंदिन कामे बाजूला सारून नगरपालिकेच्या फेऱ्या मारीत असतात परंतु, मुख्याधिकारी नसल्याने त्यांच्या पदरात निराशाच पडत आहे. दिवसाची रोजी तर गेलीच पण कामही होत नसल्याने नागरिक वारंवार नगरसेवकांच्या घरी जाऊन आपली गाराणी सांगत आहेत.
आरमोरी नगरपरिषदेच्या घरकुल योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे आणि ज्या लोकांनी घरकुल मंजूर करण्यासाठी कागदपत्रांची जुळवा जुळव करून जेव्हा घरकुल मंजूर झाले तेव्हा त्यांना थोडासा दिलासा मिळाला होता, ज्या घरकुल धारकांना बांधकामाचे आदेश मिळाले त्यांनी काम चालू केले. हातात असलेल्या संपूर्ण भांडवल लावून घरांची सुरुवात केली आणि गोरगरीब जनतेची नव्या घरांची स्वप्न रंगत असताना, जेव्हा हातातला पैसा संपला आणि घरकुलांचे हप्ते मिळवण्यासाठी अर्ज केले असता मुख्याधिकारी हजर राहत नसल्यामुळे तिथे त्यांच्या सही विना ऑनलाईन होत नसून ती देयके प्रलंबित पडले आहे. लाभार्थी रोज नगरपालिकेच्या नगरपालिकेत येऊन चकऱ्या मारत आहेत हप्ता न मिळाल्याने अनेकांचे बांधकाम रखडले आहे अनेकांनी बांधकामासाठी आणलेला कच्चामाल रस्त्यावर पडलेला आहे अनेकांनी राहते घर पाडल्याने किरायाच्या घरात राहत असल्याने त्यांच्यावर किरांचाही भुर्दंड बसत आहे अवेळी येत असलेल्या पावसामुळे अनेकांचा कच्च्या मालाची नासाधुस होत आहे , अत्यल्प म्हणजे 2.50 लाखात घरांची स्वप्न रंगवणारी लाभार्थी घर पूर्ण होणार की नाही याच विवंचनेत आज आहेत आज पावेतो तारीख 27/03/2023 पर्यंत तब्बल 70 च्या वर लाभार्थ्यांचे देयके फक्त मुख्याधिकारी यांचे सही नसल्याने ऑनलाईन करता आले नाहीत. अशाच अनेक विभागांचे कामे हे रखडलेले आहेत काही नमुना आठ तर काही फेरफार ची प्रकरणे सुद्धा रखडलेली आहेत.
पहिल्या टप्प्यात झालेल्या घरकुलांचा शेवटचा हप्ता जवळजवळ सर्वच लाभार्थ्यांची मिळणे बाकी आहेत आणि अजून पर्यंत त्यांच्या थांग पत्ता नाही. त्यामुळे घरकुल बांधून लाभार्थी राहत असले तरी मात्र त्यांनी हातावर उसनवारी घेतल्या गेल्या लोकांची आता बोलणे ऐकावी लागत आहेत. त्यामुळे याही बाबीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, कार्यालयातील अनेक कामे ही मुख्याधिकारी नसल्याने होत नाहीत.त्यामुळे एकतर नगर परिषदेला नियमित मुख्याधिकारी द्यावे अथवा आठवड्यातून किमान 3 दिवस तरी त्यांची उपस्थिती नित्यनेमाने ठेवण्यात यावी.
अशी मागणी नगर सेवक मिलींद खोब्रागडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here