Home गडचिरोली समाज एकजूट, एकसंघ व सुशिक्षित करण्यासाठी विश्वकर्मा जयंती मोलाची ठरेल:- आमदार कृष्णा...

समाज एकजूट, एकसंघ व सुशिक्षित करण्यासाठी विश्वकर्मा जयंती मोलाची ठरेल:- आमदार कृष्णा गजबे

0
32
  1. देसाईगंज:

येत्या काळात लोहार समाज एकसंघ व एकजूट होण्यासाठी विश्वकर्मा जयंतीचे मोलाचे योगदान ठरेल या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधव एकत्र आल्याने समाजातील अडचणी व समस्यांचे निराकरण करणे सोयीचे होईल येणाऱ्या नव्या पिढि मध्ये समाज व संघटने विषयी आदरभाव वाढेल व समाज सुशिक्षित होइल असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.
लोहार समाज संघटना शाखा देसाईगंज तुकुम वॉर्ड, यांचे द्वारे आयोजीत विश्वकर्मा जयंती कार्यक्रमात आमदार कृष्णा गजबे बोलत होते.
या कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे, चरणदासजी बावणे भंडारा अध्यक्ष विदर्भ ततस्म जाती महासंघ नागपूर, सुरेश माडवगडे गडचिरोली सचिव वैदर्भीय लोहार व ततस्म जाती महासंघ नागपुर, ज्ञानेश्वर गेडाम अधीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली व समस्त समाज बांधव गावकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here