Home मुंबई शिवप्रेमी मित्र मंडळ वाशी नवी मुंबई शिवजयंती उत्साहात साजरी.

शिवप्रेमी मित्र मंडळ वाशी नवी मुंबई शिवजयंती उत्साहात साजरी.

0
57

 

दरवर्षी प्रमाणे शिवप्रेमी मित्र मंडळ वाशी नवी मुंबई येथे साजरी करण्यात आली. मंडळाच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी जन्म गडावर मशाल पेटवून मशाल रॅली वाशी नवी मुंबई पर्यंत रलीचे आयोजन करण्यात आले.या मशाल रॅलीचे स्वागत करण्याचा बहुमान माजी पोलिस आयुक्त आयु. भरत शेळके याना देण्यात आला. आयुष्यमान शेषराव आडे यांनी नेहमीप्रमाणे विशेष सहकार्य केले.सोबत सेक्युलर मूव्हमेंटचे नवी मुंबई विभाग प्रमुख आयुष्यमान सोमनाथ माने व इतर कार्यकर्ते हजर होते. शिवजयंती महोत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला या कार्यक्रमाला तरुणाई आणि महिलांचा सहभाग वाखाणण्यासारखा होता. नवी मुंबईतील वाशी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.आणि नवी मुंबई तुर्भे सेक्टर 20 येथे मशाल रॅलीचा समारोप सोहळा साजरा करताना जमलेल्या तरुणांना मार्गदर्शन केले आणि मशाल रॅलीत सहभागी झालेल्या सर्व मुलांचे अभिनंदन करून सत्कार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here