Home Breaking News 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सूचना

12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सूचना

0
56

गडचिरोली,(जिमाका)दि.09:- सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 12वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज सोबत दिनांक 31 मार्च पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे दाखल करावे. या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा (प्रस्तावांचा) विचार केला जाणार नाही. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.

तसेच प्रस्ताव सादर न केल्यास व वैधता प्रमाणपत्रा अभावी अर्जदाराचे व्यावसायीक पाठयाक्रमात प्रवेश न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य व अर्जदारांची असेल. तसेच या आधी समितीस दिनांक 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत प्राप्त झालेले प्रस्ताव निकाली (त्रृटीचे प्रकरणे वगळता) काढण्यात आलेले आहेत.ज्यांचे प्रकरण त्रृटीत आहेत,अश्या सर्व अर्जदारांचे प्रकरण त्रृटीत असल्याने अर्जदारानी दिनांक 14.03.2023 किंवा 21.03.2023 रोजी मंगळवार ला मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे. इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेणे चालू असून संबंधीत महाविद्यालयामार्फत कार्यालयामध्ये सादर करावे असे आवाहन उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here