Home Breaking News स्त्री रुग्णालयातील बंद पंख्यांवर अखेर तोडगा!

स्त्री रुग्णालयातील बंद पंख्यांवर अखेर तोडगा!

0
7

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश; तक्रारीनंतर प्रशासनाची तात्काळ कारवाई

गडचिरोली | 

गडचिरोली येथील स्त्री रुग्णालयातील अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या सिलिंग पंख्यांमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा गडचिरोलीने तातडीने दखल घेत संबंधित विभागाशी पाठपुरावा केला. परिणामी बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेने तात्काळ कारवाई करत बंद असलेले पंखे सुरू करून दिल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचे नातेवाईक उमेश वैरागडे यांनी या समस्येबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेकडे तक्रार केली होती. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्त्री रुग्णालयाच्या शल्यचिकित्सक डॉ. किलनाके यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी संबंधित विषय बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेकडे प्रलंबित असल्याची माहिती दिली.

त्यानंतर संघटनेने बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेच्या कार्यकारी अभियंता वर्मा मॅडम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तत्काळ संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना निर्देश देत समस्या दूर करण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या त्वरित प्रतिसादामुळे स्त्री रुग्णालयातील बंद असलेले पंखे सुरू करण्यात आले.

या सकारात्मक कारवाईबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता साखरवाडे साहेब तसेच बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता मोरे साहेब यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, राहुल झोडे, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार, भूषणा खेडेकर, विशाखा सिंह, लीना विस्वास, जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये, कृष्णा वाघाडे, तालुकाध्यक्ष मोरेश्वर भांडेकर, दीपक सातपुते व दिनेश मुजुमदार यांनी बांधकाम विभागाच्या तत्परतेचे कौतुक करत आभार मानले आहेत.

रुग्णांच्या मूलभूत सुविधांबाबत तक्रार होताच प्रशासनाने तत्काळ कारवाई केल्यामुळे स्त्री रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला असून, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here