Home गडचिरोली मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यापेक्षा अति महागाईमुळे उत्पादन खर्चात मात्र...

मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यापेक्षा अति महागाईमुळे उत्पादन खर्चात मात्र मोठ्या प्रमाणावर वाढ झाली – डॉ. नामदेव किरसान.

0
58

दिनांक 7 मार्च 2023 रोजी मौजा अमिर्झा ता जि गडचिरोली येथे जय अंबे नाट्य कला मंडळ च्या वतीने आयोजित “वीरा तू परतून ये रे” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या उद्घाटकीय भाषणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी मोदी सरकारने जनतेस दिलेल्या खोट्या आश्वासनांचा समाचार घेत यापुढे सतर्क राहण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे व शेतमालाला उत्पादन खर्च त्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन हवेत जिरले. त्याचप्रमाणे विदेशातून काळा धन आणून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याची वल्गना सुद्धा खोटी ठरली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ तर झाली नाहीच परंतु उत्पादन खर्चात मात्र झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांवर हलाकीचे जीवन जगण्याची वेळ आली. मोठ्या प्रमाणावर भाव वाढ करून व देशात बेरोजगारी वाढवून जनतेला नागवले जात आहे व मोदी सरकार पुंजीपतींच्या संपत्तीत वाढ करण्याचा कार्यक्रम राबवित आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, स्टेट बँक व जीवन विमा निगम मध्ये असलेला सर्वसामान्य लोकांचा पैसा मुठभर पुंजी पती लोकांच्या घशात घालण्याचे काम हे सरकार करीत आहे. करीता सरकार निवडतांना या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सदर नाटकाचे गीतकार संगीतकार व गायक युवराज गोंगले यांनी आयोजकांना संविधानाची प्रत भेट दिली.
यावेळी मंचावर उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष रामरतनजी गोहने, डॉ. चेतनजी निकोडे, शिवशंकरजी कुमरे, सुलतानजी लखानी, उपसरपंच संदीपजी भैसारे, रामभाऊ ननावरे, रजनीकांतजी मोटघरे, जितू पाटील मुनघाटे, सुनीलजी आईतुलवर, गीतकार संगीतकार युवराजजी गोंगले व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here