Home आरमोरी आरमोरी नगरातील समस्या ताबडतोब निकाली काढा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वात...

आरमोरी नगरातील समस्या ताबडतोब निकाली काढा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वात शेकडो महिलांची नगरपरिषदेवर धडक

0
74

 

*आरमोरी :—- आरमोरी नगरातील मुलभूत समस्या ताबडतोब नीकाली काढा. या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नेतृत्वात शेकडो महिला नगरपरिषद कार्यालयात धडकल्या. यावेळी नगराध्यक्ष पवन नारनवरे व तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील नंदनवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वेणूनाथ ठाकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा ज्योती सोनकुसरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा ज्योती घुटके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिवाकर गराडे, आणि शेकडो महिलांची उपस्थिती होती.

निवेदनात मागण्या करण्यात आल्या की, आरमोरी नगरपरिषद कार्यक्षेत्रात असणाऱ्या अतिक्रमण धारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. सर्व गोरगरीब जनतेचे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर असलेले घरकुल बांधकाम सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. ज्या घरकुल लाभार्थींचे बांधकाम पुर्ण झाले त्या लाभार्थींच्या बँक खात्यात त्वरीत अनुदान जमा करावे. नगरातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी दररोज मुबलक प्रमाणात पुरविण्यात यावी. नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. आरमोरी नगरपरिषद अंतर्गत स्वच्छता कंत्राट देण्यात आले आहे. परंतू सदर कंत्राटदार हा संपुर्ण शहराची स्वच्छता करीत नसल्याने संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकून संपूर्ण धनादेश थांबविण्यात यावे. नगराची स्वच्छता न करता स्वच्छतेचे धनादेश कंत्राटदाराला देणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

सदर समस्यांचे एका आठवडाभरात निराकरण न झाल्यास नगरपरिषद कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here