Home Breaking News “दिला शब्द, केला पूर्ण!” – रेगडी-हळदवाही क्षेत्रात चार सभागृहांच्या भूमिपूजनाचा उद्या भव्य...

“दिला शब्द, केला पूर्ण!” – रेगडी-हळदवाही क्षेत्रात चार सभागृहांच्या भूमिपूजनाचा उद्या भव्य सोहळा

0
24

आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या निधीतून विकासाला गती; चार गावांत सलग कार्यक्रमांचे नियोजन

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना वेग देत, आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रातील चार गावांमध्ये सभागृह बांधकामाचा शुभारंभ होत आहे. “दिला शब्द, केला पूर्ण” या भूमिकेतून उद्या, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी या कामांचे भव्य भूमिपूजन सोहळे पार पडणार आहेत.

या महत्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून, चार वेगवेगळ्या गावांत सलग कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

🕓 कार्यक्रमाचे वेळापत्रक :

सायं. ४.०० – मंजेगाव

सायं. ४.३० – मच्छली

सायं. ५.०० – मक्केपल्ली (माल)

सायं. ६.०० – विकासपल्ली

या सर्व ठिकाणी आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून, सहउद्घाटक म्हणून प्रणय भाऊ खुणे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला भाजपा ज्येष्ठ नेते भारत खटी, घोटमंडळ अध्यक्ष राकेश सरकार, चामोर्शी मंडळ अध्यक्ष रोशनी ताई वरघंटे, नरेश भाऊ अलसावार, ज्येष्ठ नेत्या अनिता राय यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

स्थानिक पातळीवर या विकासकामांबाबत मोठा उत्साह असून, मंजेगाव, मच्छली, मक्केपल्ली (माल) व विकासपल्ली येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

यामध्ये सुमेन विश्वास (विकासपल्ली), संदीप भोवरे (मक्केपल्ली), राजू सातपुते (मच्छली) व माजी सरपंच रमेश लेकलवार (मंजेगाव) यांचा समावेश आहे.

या सभागृहांच्या उभारणीमुळे ग्रामीण भागातील सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांना नवे व्यासपीठ मिळणार असून, स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे.

🔴 विशेष ठळक :

आमदार निधीतून चार सभागृहांचे बांधकाम

एका दिवसात चार गावांत भूमिपूजन सोहळे

ग्रामीण विकासाला मिळणार नवी गती

नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here