Home Breaking News करनेली-करंचा जिमलगट्टा ते देचलीपेठा – मार्गावरील खड्डे बुजवण्यात भ्रष्टाचार? माती टाकून डागडुजी;...

करनेली-करंचा जिमलगट्टा ते देचलीपेठा – मार्गावरील खड्डे बुजवण्यात भ्रष्टाचार? माती टाकून डागडुजी; नागरिकांत संतापाची लाट

0
51

🟧निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पावसात रस्ता पुन्हा उखडला; कंत्राटदारावर कारवाईची मागणी

महा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क:

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील या स्क्वेअर मीटरच्या करनेली-करंचा जिमलगट्टा–देचलीपेठा या मुख्य मार्गावर .सध्या खड्डे बुजवण्याचे काम सुरू असले, तरी या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

संबंधित काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

नियमांनुसार खड्डे बुजवण्यासाठी मुरूम व गिट्टीचा वापर करणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र मुरूमऐवजी माती टाकून काम उरकले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे JCBच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेली माती काढून तीच खड्ड्यांमध्ये भरली जात असल्याने कामाची गुणवत्ता पूर्णतः खालावल्याचे चित्र आहे.

या कामासाठी लाखो करोडो रुपयांचा निधी खर्च होत असतानाही दर्जेदार काम न करता केवळ दिखाऊ डागडुजी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे खड्ड्यांमध्ये टाकलेली माती वाहून गेली असून रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम तात्काळ थांबवून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, तसेच दर्जेदार पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here