Home आरमोरी पंचवटी नगरातील स्नेहल सिलेब्रेशन लॉनच्या मालकांवर कारवाई करा – वचित बहुजन महिला...

पंचवटी नगरातील स्नेहल सिलेब्रेशन लॉनच्या मालकांवर कारवाई करा – वचित बहुजन महिला आघाडीची तहसिलदारांकडे मागणी

0
68

आरमोरी,
आरमोरी शहरातील पंचवटी नगर या रहिवाशी क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करून स्नेहल सिलेब्रेशन लॉनच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहर शाखा वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतिने तहसिलदारांकडे निवेदन देऊन करण्यात आली .
तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचवटी नगर हा सदर क्षेत्र रहिवासी क्षेत्र असतांना सुद्धा स्नेहल सिलिब्रेशन लॉनचे मालक व्यवसायीक क्षेत्र समजून ध्वनिप्रदुषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अरेरावीपणे वागत असल्याने या नगरातील रहिवाशांना त्याचा मोठा त्रास सहन करावे लागत आहे. कार्यक्रमाचे वेळी रात्री दोन दोन वाजेपर्यंत मोठ्या आवाजात डिजे वाजवित असल्याने व उरलेले जेवन व खरकटे याच परिसरात फेकत असल्याने त्याच्या दुर्गंधीचा सुध्दा सामना येथिल रहिवाशांना करावे लागत आहे त्यामूळे सदर लॉनच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
सबंधीत लॉनच्या मालकांवर कारवाई करण्यात यावी या करीता नगर परिषद व पोलिस स्टेशन येथे दोन- तिन महिण्याआधी तक्रार करण्यात आली आहे परंतु संबंधित अधिका-यांनी ह्याची दखल घेतली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे, कारवाई न केल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतिने आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या संघटिका प्रज्ञा निमगडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळात सरिता बुल्ले, देवराव सोनकुसरे, विवेक उंदिरवाडे, सुरेखा मैंद,कपिल प्रधान वंदना खरवडे,जयश्री रामटेके, वर्षा सेडमाके, शांता आत्राम , आर .एम. वांढरे, दादाजी साखरे, यामिनी ईसाम, मोहित गुंडमवार , सुनंदा मने आदिंचा समावेश होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here