श्री किसनराव खोब्रागडे फाउंडेशनचा स्पर्श सोहळ्याचे थाटात उद्घाटन
आरमोरी दि 5/2/2025 – माणूस जर आयुष्यामध्ये अडाणी आणि अशिक्षित असला तर त्याला आयुष्यामध्ये नेहमीच खाचखंडगे निर्माण होतात यासाठी शिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे आणि शिक्षणामुळेच व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास घडवून येत असतो असे प्रतिपादन श्री किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री भाग्यवानजी खोब्रागडे यांनी आज दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी केले
श्री किसनराव खोब्रागडे फाउंडेशन अंतर्गत स्पर्श हा सांस्कृतिक कलाविष्काराचा भव्य दिव्य कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री भाग्यवानजी खोब्रागडे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव डॉ सचिनभाऊ खोब्रागडे होते तर विशेष अतिथी म्हणून आरमोरी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कैलास गवते, आरमोरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्री धनराज वाकुडकर ,नायब तहसीलदार श्री दोनाडकर साहेब ,संस्थेचे डॉ सुशीलभाऊ खोब्रागडे, किसनराव खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेंद्र भगत , यशवंत कला उच्च माध्यमिक विद्यालय ठाणेगाव चे प्राचार्य प्रशांत झिमटे,, यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रा अमरदीप मेश्राम, जॉन सर, प्रा धर्मेंद्र जनबंधु, , प्रा दौलत धोटे, प्राचार्य विवेक हलमारे ,प्रा फाल्गुन् नरुले ,प्रा केशव बोकडे ,प्रा विशाल रंगारी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणासाठी अतिशय अथक असे परिश्रम घेतले आणि या परिश्रमाच्या माध्यमातून आजच्याही युगात शिक्षणाला अतिशय महत्त्व प्राप्त झाले असून आजच्या युगात जो शिक्षणाची गंगा प्राशन करेल तो नक्कीच वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे त्यासाठी महाविद्यालयीन स्तर तसेच प्राथमिक स्तरावरतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले
डॉ सचिनभाऊ खोब्रागडे यांच्या कल्पनेतून सन 2014 मध्ये यशवंत इंग्लिश मीडियम स्कूल ची स्थापना करण्यात आली तेव्हापासूनचा हा वटवृक्ष मोठ्या दिमाखाने आज 11 वर्षे झाले तरी तेव्हापासून त्याची कायम परंपरा लाभलेली आहे याचे सर्व श्रेय येथील संस्थेचे सचिव डॉ सचिनभाऊ खोबागडे यांना जाते
या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव डॉ सचिन भाऊ खोब्रागडे म्हणाले स्पर्श हा कलाविष्कारांचा कार्यक्रम गेल्या दहा वर्षापासून खूप अविरतपणे सुरू आहे स्पर्श या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलागुणांनाच वाव मिळत नाही तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना स्टेज उपलब्ध करून देण्याचे माध्यम या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे आजच्या युगात स्पर्धा वाढली असल्याने ती टिकवून ठेवण्यासाठी पालकांनी सुद्धा प्रयत्न करावा सांस्कृतिक कार्यक्रम हे नेहमी होत असतात परंतु आपले सुरुवातीचे गुरु माता व पालक असतात त्यांनी अविरतपणे आपल्याला पाल्याला प्रत्येक क्षेत्रात उतरवण्यासाठी प्रयत्न करावा. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक कैलास गवते म्हणाले स्पर्श कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्य उद्देश म्हणजे कलागुणांना गुलांचा विकास करणे आणि कोणतेही गोष्टीत सातत्य असणे आवश्यक आहे शिक्षणात मध्ये सुद्धा सातत्याने नियोजन अतिशय आवश्यक असल्याने सदर क्षेत्रात आवड आहेत त्या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांना वळवलेच पाहिजे आणि स्पर्धेच्या युगात त्यांना टिकवण्यास यश संपादित केले पाहिजे असे याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले , नायब तहसीलदार वाकुडकर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की आरमोरी नगरपरिषद निर्माण झाल्यानंतर या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलची भव्य दिव्य बिल्डिंग आणि येथील विद्यार्थी संख्या व शिक्षण हे मी पहिल्यांदाच बघितले यासाठी संस्थेचे अध्यक्ष सचिव यांना याचे श्रेय जात असल्याचे त्यांनी याप्रसंगी म्हटले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अमरदीप मेश्राम संचालन कुमारी तेजस्विनी सहारे आणि आभार जॉन सर यांनी मानले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संताजी प्रशासकीय महाविद्यालय येथील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी , आणि यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी याप्रसंगी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या प्रसंगी विज्ञान प्रदर्शनी मध्ये उत्कृष्ट असे कार्य करणारे प्रथम द्वितीय आणि तृतीय पुरस्कार मिळाले त्या सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला सदर सांस्कृतिक स्पर्श हा सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत चालणार असल्याने या कार्यक्रमासाठी पालक व विद्यार्थी हे सुद्धा या उद्घाटन्या सोहळ्याला उपस्थित होते


