Home आरमोरी शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत धानाचे चुकारे व अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसानीची...

शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत धानाचे चुकारे व अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसानीची मदत तात्काळ देण्यात यावे 

0
36

 

 

आरमोरी – शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी नोव्हेंबर २०२४ पासून मार्केटींग फेडरेशन अंतर्गत खरेदी विक्री विविध कार्यकारी संस्थेच्या मार्फत धान खरेदी सुरु केली होती, बऱ्याच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात धान केंद्रावर दिले असता त्याचा पहिल्या हप्ता ७ डिसेबर पर्यंत मिळाला परंतु त्या पासून दिड महिन्याचा कालावधी लोटला परंतु चुकारे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकर्याना मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे.शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे धान कापणो बांधणीचे पैसे लोकांना देणे बाकी आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांचा दैनदिन व्यवहारावर मोठा परिणाम झालेला आहे. शासनाने शेतकऱ्यांचे त्वरित देण्यात येतील असे सांगितले होते, मात्र दिड महिन्याचा कालावधी लोटून जात असतानाही सरकारने ठोस पाऊल उचल केल्याचे दिसून येत आहे.

 

शेतकरी शेताच्या उत्पादकतेवर उपजीविका भागवीत असतो, असे असताना सरकारने याकडे दुर्लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. करीता शासकीय आधारभूत धान खरेदी अंतर्गत शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे त्वरित देण्यात यावे व तसेच माहे जुलै २० २३- २४ मध्ये अवकाळी अतिवृष्टी नदी नाल्यालगत असलेल्या शेतातील धान पिक पुनता गेल्याने शासनाने अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करण्यात आलेला होता. त्यामध्ये अतिवृष्टीमध्ये अनेक लोकांच्या पिकांची नुकसान झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या याद्या नुकसान भरपाई साठी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या मात्र KYC होऊन सुद्धा काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले तर काही शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत असल्यामुळे प्रलंबित धानाचे चुकारे व ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे पैसे जमा झालेले नाहीत अश्यांचे पैसे त्वरित जमा करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here