आरमोरी येथील गोटूल समितीद्वारे भव्य नागरी सत्कार
आरमोरी :- आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरा जपणे आवश्यक आहे. यामुळे विविधता आणि सामाजिक समृद्धी टिकून राहते. आदिवासी समाजाच्या पाठीशी आपण सदैव उभे असून आदिवासींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डाँ.अशोक उइके यांनी केले.
गोटूल बहुउद्देशीय समिती आरमोरी व आदिवासी विद्यार्थी संघ तालुका शाखा आरमोरीच्या वतीने तीन दिवसीय भव्य गोटूल महोत्सव सांस्कृतिक कला व क्रीडा, स्पर्धा, आदिवासी समाज प्रबोधन शिबिर, व भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार अशोक नेते, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार नामदेव किरसान, गडचिरोली वि. क्षेत्राचे आ. डॉ. मिलिंद नरोटे, आरमोरी विधा.क्षेत्राचे आ. रामदास मसराम,माजी आमदार कृष्णा गजबे,माजी आमदार डाँ.नामदेव उसेंडी, माजी आ. डॉ.देवराव होळी, माजी जि. प.उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ.आशिष कोरेटी, गोटूल समितीचे सचिव प्रा. दौलत धुर्वे,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सरचिटणीस सदानंद कुथे, भाजप तालुकाध्यक्ष पंकज खरवडे,भारत बावंनथडे ,सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिलिंद ब्राम्हणवाडे, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,रामचंद्र टेकाम, माजी जि. प.सदस्य यशवंत ताडाम, शिवा कोकोटे, मोनिका सलामे, प्रा. दिलीप कुमरे,संदीप वरखंडे, अपर्णा राऊत,युवराज सयाम, दिनेश सिडाम, ना.तहसीलदार, नरेश हलामी, शशिकांत मडावी,प्रशांत तोराम, पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार टेकाम, अविनाश कन्नाके ,विलास उसेंडी, भूषण खंडाते आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. उईके म्हणाले की, “राज्य शासनाने आदिवासी समाजाच्या विकासासाठी व्यापक धोरण आखले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज गोटुल केंद्र स्थापन केले जाईल. आरमोरी येथील गोटूल भवनासाठी ५ कोटी रुपयांचा निधी आपण देणार असून, आगामी सहा महिन्यांत आरमोरी येथे गोटुल केंद्राच्या भूमिपूजनासाठी मी स्वतः उपस्थित राहीन,” असा शब्द त्यांनी दिला. तसेच तालुक्यातील आदिवासी गावात सुद्धा आपण गोटूल साठी निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेचआदिवासी विद्यार्थ्यांसाठी थेट लाभ हस्तांरण (डीबीटी) सुलभ करण्यासाठीही शासनाने ठोस नियोजन केले असल्याचे मंत्री उईके यांनी स्पष्ट केले. “आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या खात्यात डीबीटी रक्कम थेट जमा होईल. यासाठी आंदोलनाची गरज भासणार नाही.पेसा योजनेअंतर्गत पुढील सहा महिन्यांत पदभरतीचे नियोजन करण्यात येत असून, त्याद्वारे आदिवासी समाजातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.आदिवासी समाजासाठी पक्षीय मतभेद विसरून आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन ना.उईके यांनी केले.
खासदार किरसान म्हणाले की,आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे पूजक व संस्कृतीचे रक्षक आहेत.आदिवासी समाजाच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी खा. अशोक नेते यांनी, आदिवासी समाजाच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
तत्पूर्वी, आरमोरी येथील गोटूल समितीच्या वतीने बर्डी टी पॉईंट येथे ना.डॉ. अशोक उईके तसेच मान्यवरांचे आदिवासी नृत्य व आदिवासी पारंपरिक ढोलताशांच्या व लेझीमच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.व गोटूलभूमी पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन गोटूल समितीचे संस्थापक सचिव प्रा.दौलत धुर्वे, सूत्रसंचालन नीलकंठ सयाम,अनिल होळी, प्रास्ताविक तुकेश नरोटे तर आभार दिलीप घोडाम यांनी मानले.
सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोटूल बहुउद्देशीय समिती व आदिवासी विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.


