आरमोरी :– –खेडुले कुणबी समाज जीवनमूल्ये विकास संथेच्या वतीने महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रमाचे नुकतेच दत्त मदीर आरमोरी बर्डी येथे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी जगद्गुरु संत तुकाराम महाराज राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी श्रीमती मनीषाताई दोनाडकर माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी महिलांची सुरक्षितता सबलीकरण यावर प्रकाश टाकून जागृती पर मार्गदर्शन केले कार्यक्रमात उपस्थित महिलांनी गीत गायन केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उखाणे घेऊन कार्यक्रमासाठी गोडवा निर्माण केला त्यानंतर निसर्ग माझा मित्र म्हणून वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संदेशातून प्लास्टिक कुंडीचे वाण म्हणून वाटप करण्यात आले तसेच सौ जयश्री राऊत यांना पतंजली मार्फत योग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी समाजाच्या वतीने समाज प्रबोधन व भविष्यातील वाटचाल याबाबत सभेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे पदाधिकारी सर्वश्री गोपीनाथजी नखाते ,सदाशिवजी धोटे, डॉ राम राऊत ,मधुकर दोनाडकर ,शहाजी खरकाटे ,किशोर ठाकरे ,जयंत राऊत,प्रा दौलत धोटे ,दिलीप दिवटे, शालिकराम राऊत, शालिक पत्रे, ज्योती बांडे ,दीपक धांडे भाऊराव तलमले तसेच बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुरेख संचालन दौलतराव कुथे यांनी केले तर आभार मेघराज बुराडे यांनी मानले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सौ पुष्पा दिवटे मंजुषा दोनाडकर ,रेविता दोनदकर, मंगला धोटे ,अनिता कुथे, आदींनी अधिक अथक परिश्रम घेतले


