विजेत्या टीमला तीन लाख रुपयांचा तर उपविजेत्या टीमला पाऊने दोन लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान
आरमोरी-येथील युवामंच ,प्रकाश चषक आयोजन समिती व मॉर्निंग ग्रुप आरमोरीच्या वतीने हितकारिणी विद्यालय,क्रीडा संकुल आरमोरी येथे भव्य रात्रकालीन क्रिकेट स्पर्धा दिनांक ०३ जानेवारी पासून सुरू असून आज दिनांक १५ जानेवारीला अंतिम सामना खेळला गेला. आरमोरी येथील अक्षय एलेवन क्रिकेट टीम व गडचिरोलीचा नवशक्ती क्रिकेट संघ यांच्यात अंतिम सामना(फायनल) खेळला गेला.झालेल्या चुरशीच्या व रोमांचक सामन्यात आरमोरी येथील अक्षय इलेव्हन टीमने गडचिरोलीच्या नावशक्ती टीमचा पराभव करून विजय मिळवला.तर उपविजेत्याचा मान नवशक्ती संघाला प्राप्त झाला.
आरमोरी येथील अक्षय इलेवन क्रिकेट क्लब ने प्रथम पारितोषिक पटकावल्याने युवामंच व प्रकाश चषक आयोजन समितीच्या वतीने नागरी सहकारी बँक गडचिरोलीचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार , माजी आ.कृष्णा गजबे, यांच्या वतीने विजयी संघाला प्रकाश चषक व ३लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर उपविजेत्या नवशक्ती गडचिरोलीच्या संघाला पाऊने दोन लाख रुपयांचा पुरस्कार व चषक देऊन गौरविण्यात आले.
तसेच तृतीय पुरस्कार तालुकास्तरीय प्रथम भारत स्टार क्रिकेट संघाला ३१ हजार रुपये तर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार लव-कुश क्रिकेट संघ आरमोरी यांना ३१ हजार रुपये देऊन प्रदान करण्यात आला.तसेच ‘मॅन आफ दि मॅच’चा पुरस्कार अक्षय इलेवन क्रिकेट संघ आरमोरीचे संघाचे सागर भंडारी तर ‘मॅन ऑफ दि सिरीज’चा पुरस्कार भारत स्टार संघाचा केतन घोसे यांना प्रदान करण्यात आला. तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नवशक्ती क्रिकेट संघाचे कामरान अली यांना देण्यात आला.ग्रामीण भागातील सर्वोत्तम क्रिकेट टीम चा पुरस्कार आरमोरी येथील के.के क्रिकेट संघाला मिळाला. तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून अश्वि इलेव्हन संघाच्या विशाल याला एकता टाईल्स कडून प्रदान करण्यात आला.. तसेच रात्रकालीन झालेल्या प्रकाश चषकात यु.ट्यूब.वर थेट प्रक्षेपण पहिल्या दिवशी सामना सुरू झाल्यापासून ते अंतिम सामन्यांपर्यंत दाखविणाऱ्या वडसा येथील संदेश वाघमारे तसेच रात्रकालीन दिव्यांची सजावट करणाऱ्या देवा डेकोरेशन च्या साहिल सय्यद यांचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ठ कॉमेंटरी करणारे जी एम. खान, निलरतन मंडल, यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्कोअर हितेश कोपुलवार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.यावेळी बक्षीस वितरक म्हणून प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आ. कृष्णा गजबे तर प्रमुख अतिथी म्हणून आरमोरी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डाँ. सचिन खोब्रागडे,श्रीहरी कोपुलवार, तहसीलदार उषा चौधरी, सहा.पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे,पोलीस उपनिरीक्षक सुरज अनपट,आदी मान्यवर उपस्थित होते.
बक्षीस वितरण सोहळ्यात प्रकाश सावकार म्हणाले की,ग्रामीण भागातील तरुणांचे क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी व ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ देण्यासाठी प्रकाश चषकाचे आयोजन करण्यात आले. १५ दिवस चाललेल्या या स्पर्धेत कुठलेही गालबोट न लागता ह्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.व ते युवामंचच्या व प्रकाश आयोजन समिती व मॉर्निंग ग्रूपच्या सदस्यांनी यशस्वी करून दाखविले.त्यांचे कार्य प्रशंसनीय आहे.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून विजेत्या व उपविजेत्या संघातील सर्व क्रिकेटपटूना तसेच युवामंच, प्रकाश चषक आयोजन समिती,व मॉर्निंग क्रिकेटच्या खेळाडूंना सर्व मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले.
प्रकाश चषकात राज्यातील व परराज्यातील ४० टिमांनी सहभाग घेतला होता. १५ जानेवारीला झालेल्या उपांत्य व अंतिम सामना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.जवळपास १० हजार महिला व पुरुषांनी हा सामना प्रत्यक्ष मैदानावर बघितला. तर जवळपास २० ते २५ हजार नागरिकांनी हा सामना यू ट्यूबवर बघितला. हा सामना बघण्यासाठी राज्यातील व परराज्यातील नामांकित खेळाडू सुद्धा आले होते.अंतिम सामन्याची गर्दी व रंगत वाढणार म्हणून व काही अनुचित घटना घडू नये म्हणून आरमोरी पोलिसांनी मैदानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता
प्रकाश चषकाच्या सर्व सामन्याचे पंच म्हणून व्ही.सी.ए.चे आशिष बावनकुळे(ब्रम्हपुरी),संजय बुंदेले(बुलढाणा) ,उपेंद्र थापा,निलरतन मंडल,श्रेयस सोमनकार( आरमोरी) यांनी आपली मोलाची भूमिका पार पाडली.
युवामंचचे मुख्य प्रवर्तक तथा मार्गदर्शक प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शनाखाली हा तुरनामेंट यशस्वीपणे पार पडला.
प्रकाश चशकाच्या यशस्वीतेसाठी युवामंच,प्रकाश चषक व मॉर्निंग ग्रुपचे पवन नारनवरे, पंकज खरवडे विलास ,पारधी , भारत बावनथडे ,गोविंदा भोयर, कृनाल पिलारे,अक्षय हेमके, नंदू नाकतोडे, शुभम निंबेकर,मुकुल खेवले, स्वप्नील कारकुरवार , सुरज कारकुरवार, टिंकू बोडे, मिथुन मडावी, यामेश निंबेकर, युगल सामृतवार ,हितेश कोपुलवार, मनोज मने ,जीतू ठाकरे अमोल खेडकर , रुपेश पुणेकर प्रसाद साडवे , चंदू आकरे, दादू राठोड, अक्षय बाडगेवार, शुभम नारदेलवार, नितीन राऊत, पवन भोयर, टिंकू चौके, साहिल गोंदोडे, प्रफुल खापरे, करण दुमाणे, पीयूष गोडोळे, साहिल, गोंदोडे , मयूर वाकडे, अक्षय धात्रक , हिमांशू कानतोडे , नितीन गोदोडे , नितीन सपाटे , चेतन धोटे, रोहन कुथें , सचिन जीवतोडे, अमोल दिवटे यांनी अथक परिश्रम घेतले.


