महिलांना भाविकांना कपडे बदलण्यासाठी उभारले तंबू
आरमोरी :- नेहमी सामाजिक ,सांस्कृतिक, क्रीडा ,आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या युवारंग तर्फे मागील ८ वर्षापासून मकरसंक्रांती निमित्य वैनगंगा नदीवर स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने जागोजागी कचरापेटी लावून वैनगंगा नदीची स्वच्छता केली गेली तर नदीपात्रात पवित्र स्नानासाठी येणाऱ्या महिला भाविकांना उघड्यावर कपडे बदलावे लागत असल्याची बाब लक्षात घेऊन महीला भगिनिंसाठी कपडे बदलविण्यासाठी तंबू भरले गेले युवारंग परिवार तर्फे दरवर्षी अविरत व निस्वार्थ पने हे कार्य केले जाते आहे वैनगंगा नदीचे पात्र स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी दरवर्षी स्वच्छता अभियान राबविण्यात आले याप्रसंगी युवारंग चे संस्थापक तथा अध्यक्ष राहूल जुआरे, स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, युवारंग चे कार्य सचिव पंकज इंदूरकर, युवारंग चे सदस्य लीलाधर मेश्राम, महेंद्र मने, लक्ष्मण निमजे, सुरेश मेश्राम, मनोज गेडाम,रोहीत बावनकर, सुमित खेडकर उपस्थित होते यावेळी वैनगंगा हमारी माता हे स्वच्छ रखना आता है अशा घोषणा देऊन वैनगंगा नदीच्या स्वच्छतेची जनजागृती करण्यात आली.


