Home गडचिरोली मनुष्याच्या जीवनात कुटुंब, त्यातून मिळणारे संस्कार यांना सर्वात जास्त महत्व असते –...

मनुष्याच्या जीवनात कुटुंब, त्यातून मिळणारे संस्कार यांना सर्वात जास्त महत्व असते – अरविंद सावकार पोरेड्डीवार 

0
56

 

जि.म.सहकारी बँकेच्या वतीने लोकनेते भाग्यवानजी खोब्रागडे जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित

आरमोरी –

मानवी जीवन जगताना कुटुंबाला महत्त्व दिले आहे. कुटुंबाचे संस्कार हे त्या कुटुंबातील सदस्यांना घडविण्याचे काम करीत असते. कुटुंबाची गौरवशाली परंपरा चालवत त्या विचारावर चालत राहणे ही सोपी बाब नाही. त्यामुळे मनुष्याच्या जीवनात कुटुंब, त्यातून मिळणारे संस्कार यांना सर्वात जास्त महत्व असते. असे प्रतिपादन सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर चे अध्यक्ष तथा सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी केले.

ते आरमोरी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथील स्वागत मंगल सभागृहात आयोजित जिल्हा गौरव पुरस्कार वितरण व आर्थिक वर्ष २०२३-२४ या वर्षात वाघाच्या हल्ल्यात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत धनादेश वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाला पुरस्कार वितरक म्हणून पद्मश्री परशुरामजी खुणे होते.सत्कार मूर्ती किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे तर विशेष अतिथी म्हणून गडचिरोली नागरी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आमदार कृष्णाजी गजबे, आदर्श विद्यालयाचे सचिव मोतीलाल कुकरेजा ,आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईश्वरपासेवार, उपसभापती व्यंकटी नागीलवार भाग्यलक्ष्मी खोब्रागडे माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, आरोग्य सभापती भारत बावनथडे, गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, शालिक विधाते, दादाजी चौधरी, वसंतराव मेश्राम, श्रीहरी बंडावार,मानद सचिव अनंत साळवे खेमराज पाटील डोंगरवार, डॉ.लाकडे जागोबा खेडकर, भैय्याजी वाढई, डॉ.दुर्वेश भोयर, खिरसागर नाकाडे, मदन मेश्राम, हेमंत पाटील खुणे, शेषराव येलेकर, तानाजी चापले ,चंद्रकांत शिवरकर, नागदेवे आदी मान्यवर उपस्थित होते.

.पुढे बोलताना अरविंद सावकार म्हणाले की, भाग्यवानजी खोब्रागडे यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक,आध्यात्मिक व धार्मिक कार्यासह इतर क्षेत्रातील सक्रीय योगदानामुळे त्यांचा नावलौकिक आहे.अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाची निवड ‘जिल्हा गौरव पुरस्कारासाठी” होणे,ही बाब आरमोरीकरांसाठी अत्यंत आनंददायी तर युवावर्गांसाठी प्रेरणादायक आहे. शांत,प्रेमळ, दिलदार, उत्साही सुस्वभावामुळे त्यांनी जनतेचा विश्वास व मन जिंकले,म्हणूनच ते लोकनेते म्हणून सुपरिचित आहेत.

पद्मश्री परशुराम खुणे म्हणाले की शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षणाची उंची गाठलेली आहे. त्या व्यक्तीनी आपले शैक्षणिक क्षेत्र आपल्या सर्वांना खोलून दिलेले आहे .या कार्याची दखल घेऊन जिल्हा सहकारी बँकेने त्यांना जीवन गौरव पुरस्कार दिला. असे पुरस्कार माणसाला प्रेरणा देतात, जगण्याची जिद्द देतात अशी माणसं मात्र आता दुर्मिळ झालेली आहे.

सत्कारमूर्ती खोब्रागडे म्हणाले की, २०२३-२४ चा जीवनगौरव पुरस्कार माझ्यासारख्या माणसाला देऊन या पुरस्काराची उंची वाढवली आहे. परंतु माझे कार्य मोठे नाही मला हा मिळालेला पुरस्कार माझा नसून आरमोरीकरांचे प्रेम असून हा पुरस्कार मी जनतेला समर्पित करीत आहे आ. गजबे म्हणाले की,आजच्या कार्यक्रमात जे सत्कारमूर्ती आहेत,त्यांना बघितलं तर त्यांच्या परिचयाची काहीच गरज नाही.पण काही लोक स्वतःच्या गुणांनी व कर्तृत्वान्नी स्वतःची एक वेगळी प्रतिमा तयार करतात आणि ती प्रतिमा त्यांचा परिचय करून देते.कारण आजच्या सत्कारमूर्ती अधिक उंचीच्या आहेत. तर प्रास्ताविक भाषणात प्रकाश सावकार म्हणाले की, संस्कृती व सांस्कृतिक मूल्ये जोपासणारे भाग्यवानजी खोब्रागडे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून शिक्षणाची दालने तयार केली.

यावेळी जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने, सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार व मान्यवरांच्या उपस्थितीत पद्मश्री परशुराम खुणे यांचे शुभ हस्ते शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे यांना सन २०२३-२४ चा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व रोख ५१ हजार रुपये देऊन सन्मान करण्यात आला. देऊन गौरविण्यात आले.याच कार्यक्रमाचे औचित्य साधून मा.भाग्यवान खोब्रागडे यांच्या कार्यवेध पत्रिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच ०३ जानेवारी २०२४रोजी सुलोचना विठ्ठल गोडे रा.वाकडी व १४ मे २०२४ ला आंबेशिवणी येथील पार्वता बालाजी पाल ह्या महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्या तसेच नरोटी येथील विजया विलास गेडाम ह्यांचेवर वीज पडून ठार झाले होते. या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी ७५ हजारांचा धनादेश गडचिरोली जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.तसेच सहकारी बँकेत मागील ४० वर्षांपासून सुरळीत खाते असलेले पत्रुजी भांडेकर, नथूजी देवीकर, अनुसया टिचकुले, तानू गोंडोळे ,सिंधू भोयर, कुसुम हेडाऊ, मोतीराम मुरवतकर ,बाळकृष्ण डोकरे ,वेणू वडपल्लीवार, शालिनी गेडाम अशा १० जेष्ठ खातेधारकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यात

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश सावकार पोरेड्डीवार, संचालन प्रा.डाँ.नरेंद्र आरेकर तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयललवार यांनी मानले. कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बँकेचे कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here