Home आरमोरी डॉ.आशिष कोरेटी यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती.

डॉ.आशिष कोरेटी यांची महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती.

0
33

 

आरमोरी…ऑल इंडीया आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे व प्रदेशाध्यक्ष बळवंत गावीत यांनी

आदिवासी बहुल भागात काँग्रेसच्या वाढीसह जनसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या डॉ. आशिष कोरेटी यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ.आशिष कोरेटी यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये सन २०१४पासून आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशन व वन-जन-हक्क फाउंडेशन मार्फत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्नांना मार्गी लावन्यापासून ते ग्रामीण भागात अनेक असंख्य आरोग्य शिबीर घेऊन रुग्णांना सेवा दिली.सदर कामांची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सचिव पदी डॉ. आशिष कोरेटी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here