Home कोरची पारबताबाई विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप

पारबताबाई विद्यालयात विद्यार्थिनींना सायकल वाटप

0
25

 

कोरची:-

येथिल स्थानिक पारबताबाई विद्यालयात बाहेर गावाहून शिक्षणासाठी शाळेत ये-जा करणाऱ्या 50 विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण गुरुवारला करण्यात आले.

मानव विकास मिशन योजनेतून विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देण्यात आला. कोरची येथे कोचिनारा , सातपुती , काळे , साले , दवंडी , मोहगाव , कोसमी, पकन्नाभट्टी आदी गावातील विद्यार्थिनीं शिक्षणासाठी ये-जा करणे सोयीचे व्हावे.यासाठी मानव विकास योजनेतून सायकलींचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदासजी साखरे , संस्थेचे कोषाध्यक्ष मनसारामजी अंबादे ,सदस्य विठ्ठलजी भैसारे, शाळेचे मुख्याध्यापक एस एस कराडे , शिक्षक हरिश्चंद्र मडावी , क्रुष्णामाई खुणे, महेश चौधरी ,सुरज हेमके ,वसंत गुरनुले ,जीवन भैसारे ,निर्मला मडावी तुळशीराम कराडे , आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन सुरज हेमके तर आभार हरिश्चंद्र मडावी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील कर्मचारी मुन्शीलाल अंबादे , कैलाश अंबादे , प्रल्हाद बागडेरिया , पराग खरवडे आदी ने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here