Home कोरची एक हात मदतीचा. .. छत्रपती शिवाजी महाराज बचत गटातर्फ अथर्व मोहुर्ल याला...

एक हात मदतीचा. .. छत्रपती शिवाजी महाराज बचत गटातर्फ अथर्व मोहुर्ल याला आर्थिक मदत

0
33

 

छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचा अनोखा उपक्रम

 

कोरची :-

कोणतेही कार्य करण्याची इच्छा असून चालत नाही, तर ते कार्य करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते आणि हे सर्व करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज बचत गट करीत आहे. व भविष्यातही करत राहिली याच शंका नाही. याच्याच एक उदाहरण म्हणजे मागील दीड महिन्यापूर्वी कोरची येथील अथर्व मोहुर्ले रस्त्याच्या कडेला उभे असताना दुचाकीस्वाराने अथर्व मोहुर्ल याला धडक दिली. यामध्ये अथर्वला डोक्याला गंभीर दुखापत झाली. कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता करिता बाहेर हलविण्याची सूचना दिली. त्यामुळे अथर्व ला ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले. एक महिना बेशुद्ध अवस्थेत होता. अथर्वचे वडील भाऊराव मोहुर्ले यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांनी आपल्या पाल्याला त्याच हॉस्पिटलमध्ये ठेवले. व त्याच ठिकाणी उपचार घेत आहेत. परंतु उपचाराकरिता खूप खर्च येत असून, त्यांना एक मदत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बचत गटाचे सदस्यांनी पुढाकार घेऊन, आर्थिक मदत करण्याचे ठरविले. व छत्रपती शिवाजी महाराज बचत गटातर्फे त्यांना आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी सदरुद्दिन भामानी ,मनोज अग्रवाल, बचत गटाचे अध्यक्ष नामदेव नागपुरे ,नंदूची गोबाडे, सचिव सुरज हेमके, चेतन कराडे, प्रफुल खरवडे, राहुल खरवडे, आधी बचत गटाचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here